बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेला यांचा आगामी ‘गदर 2’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आज 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करताना दिसून येत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच, सनी देओल आणि अमीषा पटेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोघेही डान्स करताना दिसत आहेत.
सनी देओल आणि अमीषा पटेलचा व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल ‘गदर 2’ चित्रपटाचं जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. ते दोघेही प्रमोशनसाठी अहमदाबादला गेले होते त्यावेळी त्यांनी ‘गदर 2’मधील ‘मैं निकला गड्डी लेके’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी उभे असलेले प्रेक्षकही त्यांना प्रोत्साहन देताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडीओवर चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
2001 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘गदर’
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’चित्रपटाची प्रेक्षक मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’चा दुसरा भाग असून या चित्रपटामध्ये देखील सनी देओल आणि अमीषा पटेला मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.