घर मनोरंजन आवडत नसेल तर चिडवू नका... चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सनी देओलने मागितली माफी

आवडत नसेल तर चिडवू नका… चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सनी देओलने मागितली माफी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेला यांचा आगामी ‘गदर 2’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आज 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करताना दिसून येत आहेत. प्रेक्षकही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच, सनी देओलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानत आहे तसेच त्यात तो प्रेक्षकांची माफी मागताना देखील दिसत आहे.

सनी देओलने मागितली माफी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सनी देओलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये तो म्हणाला की, “तुम्हा सर्वांना नमस्कार… मी आत्ताच उठलो आणि मला तुमच्या सर्वांशी बोलायचे आहे. कारण इतके दिवस मी फिरत आहे… तुमच्याशी बोलत आहे आणि मला माहित आहे की तुमचे तारा सिंग आणि सकीनाच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. ज्याची तुम्ही वाट पाहत होता ते आज तुम्ही बघणार आहात. मी एवढंच म्हणेन की, हे कुटुंब जसं तुम्ही सोडलं तसंच आहे. ते एक सुंदर कुटुंब आहे आणि तुम्ही सगळे त्याला भेटायला जाल… मग तुम्हाला खूप आनंद होईल मात्र, चुकून जर हे कुटुंब कुणाला आवडत नसेल तर चिडवू नका… माफ करा. कारण हृदयात केवळ प्रेम असायला हवं. लव्ह यू ऑल…. ऑल द बेस्ट” असं सनी देओल म्हणाली.

2001 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘गदर’

- Advertisement -

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’चित्रपटाची प्रेक्षक मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’चा दुसरा भाग असून या चित्रपटामध्ये देखील सनी देओल आणि अमीषा पटेला मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा : ‘गदर 2’ च्या प्रमोशनमध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -