Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन मका पार्टी करत सनी देओलने मित्रांसोबत साजरा केला 65 वा वाढदिवस

मका पार्टी करत सनी देओलने मित्रांसोबत साजरा केला 65 वा वाढदिवस

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आज 65 वा वाढदिवस आहे. याचं निमित्ताने त्यांनी आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला आहे. मात्र, आज त्यांनी त्यांचा वाढदिवस कोणत्याही हॉटेलमध्ये केक कापून साजरा केला नाही. नुकताच एक फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या जुन्या मित्रांसोबत भाजलेला मका खाताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

या फोटोंमध्ये सनी देओल रस्त्याच्या बाजूला उभा राहून मित्रांसोबत मका खाण्याचा आनंद घेत आहे. हा फोटो शेअर करत सनी देओलने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “वाढदिवसाच्या निमित्तान् गँगसोबत मक्याची ट्रीट”

- Advertisement -

सनी देओल च्या या पोस्टवर अनेकजण खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “सर आम्ही तुमच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत” तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की,”बॉलिवूडच्या अॅक्शन किंगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” दरम्यान, सध्या सनी देओल त्यांचा 65 वा वाढदिवस मनालीमध्ये साजरा करत आहेत.

‘गदर 2’ लवकरच होणार प्रदर्शित
सनी देओल यांनी 1983 मध्ये ‘बेताब’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांचा 2001 साली प्रदर्शित झालेला ‘गदर’ सुपरहिट ठरला होता. येत्या काळात अवघ्या 22 वर्षानंतर सनी देओलचा ‘गदर 2’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

इफ्फीसाठी निवडलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -