HomeमनोरंजनJaat Movie : सनी देओलच्या जाट सिनेमाची रिलीज डेट जाहीर

Jaat Movie : सनी देओलच्या जाट सिनेमाची रिलीज डेट जाहीर

Subscribe

बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओलचा आगामी सिनेमा ‘जाट’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. ‘गदर 2’ या सिनेमाच्या भव्य यशानंतर आता पुन्हा एकदा सनी देओल बॉक्स ऑफिसवर जादू करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा ‘जाट’ सिनेमा चर्चेत होता. अशातच आता मेकर्सने हा सिनेमा येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी एक नवं पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.

अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफ़ाड कमाई केली होती. त्याचा हा ऍक्शन सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला होता. यानंतर आता पुन्हा एकदा ‘जाट’ या ऍक्शन सिनेमामध्ये अभिनेता सनी देओल एकापेक्षा एक ऍक्शन सीन देताना दिसणार आहेत. त्यामुळे आतापासूनच या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे. दरम्यान, मेकर्सने शुक्रवारी 24 जानेवारीला सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या नव्या पोस्टरमध्ये अभिनेता सनी देओल फुल ऍक्शन अवतारात दिसतोय.

‘जाट’ सिनेमा कधी रिलीज होणार?

अभिनेता सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर करताना मेकर्सने एक पोस्ट शेअर केले आहे. ज्यावर हा सिनेमा 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सिनेमाचा टिझर डिसेंबरमध्ये रिलीज करण्यात आला होता. यानंतर आता सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

जबरदस्त स्टारकास्ट

गोपीचंदन दिग्दर्शित ‘जाट’ या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सनी देओल धमाकेदार ऍक्शन भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. त्याच्याशिवाय अभिनेता रणदीप हुड्डा, सैयामी खेर और रेजिना कैसेंड्रासारखे अन्य काही दमदार कलाकार देखील या सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे. तर छायांकन ऋषि पंजाबी यांनी केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या वर्कफ्रंटबदल सांगायचं झालं तर, ‘गदर 2’ या सिनेमानंतर तो थेट ‘जाट’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय आगामी काळात त्याचे बरेच सिनेमे येणार आहेत. ज्यामध्ये आमिर खान प्रोडक्शन्सचा सिनेमा ‘लाहौर 1947’ आणि जेपी दत्ता यांचा ‘बॉर्डर’चा सीक्वल ‘बॉर्डर 2’ यांचा समावेश आहे.

 

 

 

हेही पाहा –