बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट लुकने घायाल करणारी सनी लिओनी ही अल्पवधीकाळात खूप लोकप्रिय झाली. सनीने या क्षेत्रात पॉर्नपटांमधून पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये तिने सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता नेपाळी चित्रपटातून सनी तिचा जलवा दाखवणार आहे.
सनीने तिच्या टि्वटर अकाऊंटवरून ती ‘पासवर्ड’ या नेपाळी चित्रपटातील एका गाण्यात झळकणार असल्याने तिने टि्वट केलं आहे. १३ सप्टेंबर रोजी हा ‘पासवर्ड’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. तसेच तिने ‘एबीइंटरनॅशनल८’ आणि ‘अमितबस्नेट’ यांचे आभार मानले आहे.
Hey everyone!! I am so excited for my first Nepali song in the movie #Password!! Releasing on 13th September worldwide!!
Check it out here:https://t.co/sooPNdxuEf
Thank you @ABInternationa8 and @AmitBasnett pic.twitter.com/FmqcAMCDgu— Sunny Leone (@SunnyLeone) August 6, 2019
लवकरच सनी उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित असलेला ‘कोका कोला’ या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटाची तारिख ही अजून निश्चित झालेली नाही. सध्या सनी लिओनी ही ‘रंगीला’ या मल्याळम चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. सनी पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटात काम करताना दिसणार आहे.