Sunny Leone: सनीचा भर रस्त्यात लुंगी डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी झाले खल्लास

Sunny Leone lungi dance video viral on set of oh my ghost movie
Sunny Leone: सनीचा भर रस्त्यात लुग्गी डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी झाले खल्लास

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सनी रोज अनेक पोस्टमधून तिच्या फॅन्ससोबत कनेक्ट असते. सनीच्या सगळ्याच पोस्ट चर्चेचा विषय ठरतात. सनीने नुकताच शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे सनी चांगलीच चर्चेत आहे. एरवी बोल्ड अवतारातली सनी या व्हिडिओत चक्क लुंगी डान्स करताना दिसतेय. सनीचा हा आगळा वेगळा अवतार पाहून नेटकरी अवाक झालेत. सनी मात्र लुंगी नेसून बिनधास्त नाचताना दिसतेय. सनीच्या ठुमक्यांवर नेटकरी चांगलेच फिदा झाल्याचं पहायला मिळत आहे. सनीचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

सनीचा हा व्हिडिओ आहे चेन्नईमधला. सनी सध्या चेन्नईमध्ये ओह माय घोस्ट या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. शुटींग दरम्यानचा गाण्याचा व्हिडिओ सनीने शेअर करत सनीने कॅप्सनमध्ये म्हटलय, चेन्नईत ओह माय घोस्टच्या सेटवरील माझे सर्वात आवडते गाणे, तुम्हाला हे गाणे आवडले का? असे म्हणत सनीने व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

व्हिडिओत सनीने गुलाबी रंगाचा शर्ट आणि त्याखाली निळ्या रंगाची लुंगी घातली आहे. तर सनीने गळ्यात टपोरी लोकांसारखा रुमाल बांधलाय आणि सनी तुफान नाचत सुटली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी केवळ दिसायला सुंदर नसून ती एक चांगली अभिनेत्री आणि उत्तम डान्सर असल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. हा व्हिडिओ पाहून सनीच्या फॅन्सनी तिचे प्रचंड कौतुक केले आहे.


हेही वाचा – HBD Superstar Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवशी क्रिकेटर हरभजनच्या टॅटूने वेधलं सर्वांचं लक्ष