Sunny Leone : सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, सिबिल स्कोर झाला खराब, काय आहे प्रकरण?

सनी लिओनीचे पॅन कार्ड वापरुन एका व्यक्तीने २ हजार रुपयांचे कर्ज काढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सनीने तिच्या ट्विट अकाऊंटवरुन ही माहिती तिच्या चाहत्यांनी दिली. मात्र ट्विटनंतर तिला अनेकांचे फोन येऊ लागल्याने तिने ट्विट डिलीट केले.

Sunny Leone online Fraud through Dhani app using PAN card
Sunny Leone : सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, सिबिल स्कोर झाला खराब, काय आहे प्रकरण?

सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. अभिनेत्री सनी लिओनीची देखील फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. जर तुम्हीही कोणत्या अँपच्या माध्यमातून लोन घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी धनी अँप तुम्हाला माहिती असेल. टेलिव्हिजन आणि वेबसाइड्सवर अनेकदा धनी अँपची जाहिरात येत असते. या धनी अँपच्या माध्यमातून सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. सनीच्या पॅन कार्डचा वापर करुन धनी अँपच्या माध्यमातून २००० रुपयांचे लोन घेतल्याचा दावा सनीने केला आहे. या प्रकरणामुळे सनीचा सिबिल स्कोर कमी झाल्याचे सनीने सांगितले आहे.

सनी लिओनीचे पॅन कार्ड वापरुन एका व्यक्तीने २ हजार रुपयांचे कर्ज काढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सनीने तिच्या ट्विट अकाऊंटवरुन ही माहिती तिच्या चाहत्यांनी दिली. मात्र ट्विटनंतर तिला अनेकांचे फोन येऊ लागल्याने तिने ट्विट डिलीट केले.

सनीने फसवणूक झाल्यानंतर केलेले ट्विट हे इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटमेट कंपनीला टॅग केले. धनी अँप हे पहिल्यांदा इंडिया बुल्स सिक्युरिटीज लिमिटेडकडेच होते. कंपनीने आधी सनीच्या ट्विटकडे दुर्लक्ष केले मात्र नंतर कंपनीने सनीची समस्या सोडवली. सनीने कंपनीचे आभार मानत एक ट्विट देखील केले आहे.

धनी अँपच्या माध्यमातून फसवणूक झालेली सनी लिओनी ही पहिलीच नाहीये. कंपनीकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. सनीच्या ट्विट नंतर धनी अँपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या अनेकांचे मेसेज कॉल सनी येत आहेत. आमची देखील फसवणूक झाली असून याची तक्रार कुठे करायची ? कंपनीचे ऑफिस कुठे आहे ? असे प्रश्न तिला विचारण्यात येत आहेत.

सिबिल स्कोर काय असतो ?

सिबिल स्कोर म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL ) सिबिल स्कोर हा तीन अंकी क्रमांक असतो. हा क्रमांक व्यक्तीच्या क्रेडिटची हिस्ट्री आणि क्रेडिट रेटिंग दर्शवितो. हा स्कोर ३०० ते ९०० दरम्यान असतो. ९०० हा स्कोर हा सर्वोत्तम मानला जातो. तर हा स्कोर ३००च्या खाली आल्यास तुमचा सिबिल स्कोर खराब झाल्याचे म्हटले जाते.


हेही वाचा – नेटफ्लिक्स सीरिजनंतर कपिल शर्माचा आणखी एक धमाका! नंदिता दासच्या चित्रपटात घेतली एन्ट्री