बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील कलाकार त्यांच्या लाईफस्टाईल आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र सध्या सोशल मीडियावर सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सनी रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर viralbhayani ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सनी लिओनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी एका रिक्षामधून उतरताना दिसत आहे. ती रिक्षामधून उतरताच फोटोग्राफर तिचे फोटो काढताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर सनीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये सनी आपल्या महागड्या गाडी ऐवजी एका रिक्षातून प्रवास करताना दिसत आहे. तिने आपला चेहरा देखील झाकून घेतला आहे जेणे करून तिची ओळख कुणाला पटणार नाही. सनी लिओनीचा रिक्षातून प्रवास करणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सनी याआधी नेहमीच आपल्या महागड्या गाड्यांमधून प्रवास करताना दिसली आहे. मात्र यावेळी रात्री आपला चेहरा झाकून तिने रिक्षातून प्रवास करून मुंबईचा फेरफटका मारण्याची मजा अनुभवली आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटिझन्सने तिच्या या व्हिडिओवर कंमेट्स देखील केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने पारदर्शक मास्क घातलेला एक फोटो व्हायरल झाला होता. तिच्या या फॅशनवर तिचे चाहते फिदा झाले होते. यावेळी काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी तिच्यावर टीका देखील केली. दरम्यान, सनी लिओनी गेल्या महिन्यात आपल्या कुटुंबासोबत मुंबई आली आहे. लॉकडाऊन वेळी ती कुटुंबासोबत Los Angeles येथे होती.
सनी लवकरच ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सनीसोबत अभिनेता अर्जुन रामपाल, दिगांगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’मध्ये दिसणार आहे.