Sunny Leone:’मधुबन में राधिका नाचे’ बेबी डॉलला नाचतांना पाहून साधू-संत भडकले

Sunny Leone's Latest Song 'Madhuban' Lands In Controversy
Sunny Leone:'मधुबन में राधिका नाचे' बेबी डॉलला नाचतांना पाहून साधू -संत भडकले

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone) आता तिच्या नव्या अल्बम सॉंगमुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे. सनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरेत साधुसंतानी सनी लिओनीच्या नवीन व्हिडिओ साँगवर आक्षेप नोंदवला आहे. तसेच हे गाण बंद करण्याची मागणी केली आहे. साधूसंतांच्या मते अत्रिनेत्री सनी लिओनीने मधुबन में राधिका नाचे या गाण्यावर अश्लील डांस केला आहे. यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.(Sunny Leone’s Latest Song ‘Madhuban’ Lands In Controversy)

नेमकं काय घडलं.

1960 साली आलेला ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी दिग्गज गितकार मोहम्मद रफी यांनी ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणं गायलं होतं. आणि या गाण्याच्या अपग्रेडेट वर्जनवर सनी लिओनीने डांन्स केला आहे. सारेगामा म्यूजिक कंपनीने बुधवारी 22 डिसेंबर रोजी ‘मधुबन’ नावाच एक नवा व्हिडिओ जारी केला आणि यात सनी लिओनी अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. मात्र हे गाण रिलीज झाल्यानंतर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. ‘राधा आमच्यासाठी पूज्यनीय आहे’ आणि या गाण्यामुळे विशेष बाब म्हणजे सनी लिओनीमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जात आहे. ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाण लवकरात लवकर काढून टाकण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.

 

व्हिडिओ पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

मधुबन में राधिका नाचे या अल्बम साँगला लोकप्रिय कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी डिरेक्ट केलं आहे. तसेच हे गाणं वर्षाच्या अखेरीस हीट होईल अशी निर्मात्यांची आशा होती. मात्र हे गाणं दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतंय.


हे हि वाचा –  Bigg Boss 15: राखीसोबत केलं असं काही म्हणून शमितावर चिडला सलमान खान