हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

या चित्रपटात गणिततज्ज्ञाच्या भूमिकेत हृतिक रोशन दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. या पोस्टरमध्ये हृतिक रोशन आणि काही विद्यार्थी पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. तसेच पोस्टरवर भूमितीमधील काही सूत्रे दाखवण्यात आली आहेत.

नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरता चाहत्यांना होती तो ही रिलीज झाला आहे.

‘सुपर ३०’ हा चित्रपट बिहारच्या गणिततज्ज्ञ आंनद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात गणिततज्ज्ञाच्या भूमिकेत हृतिक रोशन दिसणार आहे. या चित्रपटात आंनद कुमारांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून मिळणाऱ्या यशाचा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना १२ जुलै पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

अभिनेता हृतिक रोशनने स्वतः आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे.

‘सुपर ३०’ या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु असून रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.  विकास बहल यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच हा चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात याव्यात असे दिग्दर्शक विकास बहल यांना वाटत होते. त्यामुळे ऐनवेळी काही दृश्य चित्रपटात घेण्यात आली आहे, त्यामुळे चित्रपटाला उशीर झाला होता.

या चित्रपटात हृतिक रोशन शिवाय मृणाल ठाकूर, नंदिश सिंह, रित्विक साहोरे, पंकज त्रिपाठी, अमित साध, विरेंद्र सक्सेना आणि जॉनी लिवर यांसारखे कलाकार देखील दिसणार आहे.