अमिताभ बच्चन यांनी घेतलं सायन येथील विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन; फोटो व्हायरल

महाराष्ट्रात रविवारी मोठ्या उत्साहासात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठलाच्या ओढीने लाखों भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. अनेक कलाकरांनीही वारीमध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा मुंबईमधील सायन येथील मंदिरात जाऊन विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यावेळी मंदिरात अमिताभ यांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीची महापूजा सुद्धा पार पडली.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पूजेदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच हे फोटो शेअर करत अमिताभ यांनी चाहत्यांना एकादशीच्या शुभेच्छा देखील दिल्या.

आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करत लिहिलं आहे की, “चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी तो पहा विटेवरी..विठ्ठल विठ्ठल जय हरी || जय विठ्ठल विठ्ठल जय हरी || आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा..” त्यांच्या या फोटोंवर चाहते सुद्धा त्यांना अनेक शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा ९ सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत आलिया आणि रणबीर कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय ते दीपिका आणि प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट k’ मध्ये सुद्धा दिसणार आहेत.सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.


हेही वाचा :‘सीता रमण’ चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत