घरमनोरंजनया मराठी चित्रपटांनी गाजवलं '२०१८'

या मराठी चित्रपटांनी गाजवलं ‘२०१८’

Subscribe

मराठी चित्रपटांनी '२०१८' चांगलेच गाजवल्याचे दिसून येत आहे. हे मराठी चित्रपट चांगलेच गाजले आहे. तसेच येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांना कोणते नवीन चित्रपट पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता वाढली आहे.

२०१८ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी सुवर्ण वर्ष ठरलं आहे. या वर्षी जवळपास १०० मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे केवळ मराठी भाषिक नाही तर हिंदी प्रेक्षक, कलाकार मराठी चित्रपटांकडे वळायला लागले आहेत. वर्षभरात काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला तर चित्रपट फ्लॉप ठरले. यावर्षी आलेल्या हीट ठरलेल्या सहा मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. फर्जंद, आणि काशीनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न, मुंबई-पुणे-मुंबई ३ आणि माऊली या चित्रपटांना प्रेक्षकांनी सर्वाधीक पसंती दिली आहे.

‘आणि काशीनाथ घाणेकर’ चित्रपटाने प्रेक्षकांना लावलं वेड

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार कोंडाजी फर्जंद यांच्या यशोगाथेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २५ कोटींपेक्षा जास्त गल्ला या चित्रपटाने कमवला आहे. या सिनेमाची जादू उतरेपर्यंतच दिवाळीच्या दिवसात ‘आणि काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. दमदार अभिनय आणि संवाद याच्या जोरावर आणि काशीनाथ घाणेकरची जादू प्रेक्षकांवर चालली आहे. त्यानंतर आई आणि मुलाच्या नात्यावर आधारीत नाळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यातील बालकलाकार श्रीनिवास खळेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटातील आई मला जाऊ देना वं या गाण्याला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळाली आहे. दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी या चित्रपटातून निर्मीती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. नाळ नंतर जमिनी विकल्यामुळे शेतकऱ्यांची आणि त्याच्या पुढची पिढीची होणारी अवस्था दाखवणारा मुळशी पॅटर्नने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. या चित्रपटाची गाणी, डायलॉग आणि कथा याची भुरळ प्रेक्षकांना पडली आहे. तर लेखक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

- Advertisement -

या चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं

त्यानंतर प्रेक्षकांची आवडती जोडी मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांचा मुंबई-पुणे-मुंबई ३ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेहमीप्रमाणेच या चित्रपटावर चित्रपटाच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. गौरी आणि गौतमीची पुणे- मुंबई अशी भन्नाट प्रेम कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटांचे तिनही भाग प्रेक्षकांना आवडले आहेत. तर वर्षाच्या अखेरीस रितेश देशमुख याचा अॅक्शनने भरलेल्या माऊली चित्रपटाची एन्ट्री झाली. जबरदस्त डायलॉग, भन्नाट गाणं आणि रितेशच्या अॅक्शनची जादू प्रेक्षकांवर चांगलीच चालली. एकणूच या सहा चित्रपटांनी २०१८ हे वर्ष चांगलचं गाजवलं आहे.


वाचा – ‘नाळ’ सुपरहिट! पहिल्याच आठवड्यात कोट्यावधींची कमाई

- Advertisement -

वाचा – ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ ची तीन दिवसात ५ कोटींची कमाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -