घरताज्या घडामोडीसाऊथ सुपरस्टार Mahesh Babuचा मोठा भाऊ निर्माते Ramesh Babuयांचे निधन

साऊथ सुपरस्टार Mahesh Babuचा मोठा भाऊ निर्माते Ramesh Babuयांचे निधन

Subscribe

महेश बाबू आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने दोघांना रमेश बाबूंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येणार नाहीये. दोघेही सध्या क्वारंटाइन असून कोरोनावर उपचार घेत आहेत.

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu)  मोठा भाऊ रमेश बाबू (Ramesh Babu passed away) यांचे शनिवारी निधन झाले. हैद्राबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश बाबू गेल्या अनेक दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५६ वर्षांचे होते. अभिनेता महेश बाबूला दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली. महेश आणि त्याची पत्नी घरीच उपचार घेत आहेत. महेश एकीकडे कोरोना सारख्या आजाराची दोन हात करत असताना दुसरीकडे मोठ्या भावाच्या निधनाने त्याच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रमेश बाबू यांनी साऊथ इंडियन सिनेमात मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे संपूर्ण टॉलिवूडमध्ये रमेश बाबू यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रमेश बाबू यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.

रमेश बाबू यांना गेल्या अनेक दिवसांपासून यकृताशी संबंधीत आजार होता. त्या आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्या तात्काळ हैद्राबादच्या गचीबोलवी येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच रमेश बाबू यांनी प्राण सोडले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

- Advertisement -

मोठ्या भावाच्या निधनानंतर महेश बाबूने ट्विट करत भावूक पोस्ट शेअर केलीय, महेशने म्हटलेय, ‘रमेश बाबू तू नेहमीच माझी प्रेरणा होतास, तू माझी ताकद होतास,तू नेहमीच माझे धैर्य होतास, माझे सर्वस्व होतास. तू नसतास तर आज मी जितका आहे त्याच्या अर्धा देखील नसतो. तू माझ्यासाठी जे काही केलेय त्यासाठी तुझे खूप खूप आभार’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

- Advertisement -

महेश बाबू आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने दोघांना रमेश बाबूंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येणार नाहीये. दोघेही सध्या क्वारंटाइन असून कोरोनावर उपचार घेत आहेत.

रमेश बाबू यांच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर रमेश बाबू यांनी २० हून अधिक वर्ष टॉलिवूड सिनेसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. ‘चिन्नी कृष्णुडू’ आणि ‘बाजार राउडी’ यासारख्या सिनेमात त्यांनी साकारलेल्या मुख्य भूमिका विशेष गाजल्या होत्या. रमेश बाबू उत्तम अभिनेत्यासह उत्तम निर्माते होते. ‘अर्जुन’ आणि ‘अथिधी’ या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली.


हेही वाचा – Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबू कोरोना पॉझिटीव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -