घरमनोरंजनसुपरस्टार महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान; रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते...

सुपरस्टार महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान; रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विशेष सन्मान

Subscribe

ठाणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार आज (14 नोव्हेंबर) गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. (Superstar Mahesh Kothare awarded Gandhar Gaurav Award Special Honors by Ravindra Chavan)

हेही वाचा – नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास

- Advertisement -

सुरुवातीला मराठी चित्रपट सृष्टीचा प्रवास गायन आणि नृत्याच्या माध्यमातून गंधारच्या कलाकारांनी सादर केला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कम (11 हजार 111 रूपये) देऊन कोठारे यांना गौरविण्यात आले. गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्षे होते. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले की, मी बालनाट्य क्षेत्रात भव्यदिव्य कलाकृती निर्माण करणार आहे. त्यासाठी गंधार या कला संस्थेला सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ, आ. संजय केळकर, माजी खा. डॉ. संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते, नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, अभिनेते, निर्माते मंगेश देसाई, विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आदिनाथ कोठारे हे देखील विशेष उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – Photo : सारा अली खानने शेअर केला दिवाळी लूक

आशिष शेलार काय म्हणाले?

पुरस्कार सोहळ्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले की, बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या गंधार संस्थेतर्फे या क्षेत्रात काम करणाऱ्या रंगकर्मींना दरवर्षी पुरस्कृत करण्यात येते. यंदा प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्याचे भाग्य मला लाभले. बालरंगभूमीचा विकास व्हावा आणि त्यावर सातत्याने नवे प्रयोग होत राहावेत आणि नवे कलावंत घडावेत, अशा शुभेच्छा त्यांनी बालदिनानिमित्त दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -