घरताज्या घडामोडीसुपरस्टार रजनीकांतच्या स्वॅगला तोड नाय ! Thalaivar169ची जोरदार घोषणा

सुपरस्टार रजनीकांतच्या स्वॅगला तोड नाय ! Thalaivar169ची जोरदार घोषणा

Subscribe

निर्मात्यांनी एक जबरदस्त व्हिडीओ शेअर सिनेमाची घोषणा केली आहे. व्हिडीओमध्ये संगीतकार अनिरुद्धसोबत दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार ब्लॅक कोट-पॅन्टमध्ये स्टायलिश पोझ देताना दिसत आहे. तर सुपरस्टार रजनीकांत नेहमीप्रमाणे त्यांच्या जबरदस्त स्वॅगमध्ये दिसत आहेत.

Rajinikanths Next Thalaivar 169 : तमिळ सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा त्यांचा अनोखा स्वॅग घेऊन नवा दमदार सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या थलायवी १६९ या सिनेमाची अखेर घोषणा करण्यात आली आहे.  दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्यासोबत रजनीकांत यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य तयार आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आलीय. निर्मात्यांनी एक जबरदस्त व्हिडीओ शेअर सिनेमाची घोषणा केली आहे. व्हिडीओमध्ये संगीतकार अनिरुद्धसोबत दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार ब्लॅक कोट-पॅन्टमध्ये स्टायलिश पोझ देताना दिसत आहे. तर सुपरस्टार रजनीकांत नेहमीप्रमाणे त्यांच्या जबरदस्त स्वॅगमध्ये दिसत आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांचा शेवटचा अन्नाथे हा सिनेमा २०२१मध्ये दिवाळीच प्रदर्शित झाला होता. अन्नाथे हा सिनेमा देखील सन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला होता. या सिनेमात रजनीकांतच्या यांच्या अपोझिट लीड रोलमध्ये नयनतारा दिसली होती. तर कीर्ती सुरेश रजनीकांत यांच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. रजनीकांत यांच्या या सिनेमाची देखील तेव्हा फार चर्चा झाली होती.

- Advertisement -

रजनीकांत मधल्या काळात आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुन्हा एकदा ते त्यांच्या कामाला लागले असून थलायवा हा दमदार सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. त्यांच्या नव्या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड आतूरता आहे. अनेक दिवसांपासून रजनीकांत यांच्या नव्या सिनेमाची वाट पाहत होते मात्र चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असली तरी सिनेमाची रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. चाहते सिनेमाविषयी आणखी जाणून घेण्यासाठी आतूर असल्याचे दिसत आहे.


हेही वाचा –  Shaktimaan Movie: आयकॉनिक ‘शक्तिमान’ आता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -