रणवीरचं समर्थन करत ‘या’ अभिनेत्रीने देखील केलं सेमी-न्यूड फोटोशूट

रणवीरचं समर्थन करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव एरिका पॅकर्ड असून तिने आपल्या सोशल मीडियावर सेमी-न्यूड फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. रणवीर गुन्हे दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट, विद्या बालन, यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी रणवीरची पाठराखण केली होती. आता याचं दरम्यान, एका अभिनेत्रीने रणवीरला सपोर्ट करत सोशल मीडियावर सेमी-न्यूड फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्रीने केलं रणवीरचं समर्थनॉ

 

View this post on Instagram

 

A post shared by Erika packard ❤️ (@erikapackard)

रणवीरचं समर्थन करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव एरिका पॅकर्ड असून तिने आपल्या सोशल मीडियावर सेमी-न्यूड फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पण एरिका तिच्या फोटोपेक्षा जास्त फोटोखाली दिलेल्या आगळ्यावेगळ्या कॅप्शनमुळे जास्त चर्चेत आली आहे.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
एरिका पॅकर्डचा हा फोटो पाहून नेटकरी पुन्हा संतापले आहेत. तिच्या या फोटोवर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. त्यांपैकी एकाने लिहिलंय की, “हे लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करू शकतात.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “रणवीर कडे जा.” तर दुसरीकडे काहीजण एरिका पॅकर्डचा हा अंदाज खूप पसंत करत आहेत.

न्यूड फोटोशूटमुळे रणवीरवर गुन्हे दाखल

रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम २९२,२९३, ३५४ आणि ५०९, ६७अ हे कलम लावण्यात आले होते.


हेही वाचा :तू खूप हॉट… सुष्मिताच्या व्हिडीओवर ललित मोदीची प्रतिक्रिया