घरमनोरंजन'सुप्रिम कोर्टाचा निर्णय धक्कादायक', दिग्दर्शक केदार शिंदे संतापले!

‘सुप्रिम कोर्टाचा निर्णय धक्कादायक’, दिग्दर्शक केदार शिंदे संतापले!

Subscribe

केदार शिंदे यांनी मराठी आरक्षणासंबंधी केलेले ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मराठा आरक्षणावर बुधवारी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी करण्यात आली. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे. मात्र सुप्रिम कोर्टाचा निकाल हा धक्कादायक असल्याचे म्हणत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. केदार शिंदे यांनी मराठी आरक्षणासंबंधी केलेले ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्याने, आजच्या मराठा आरक्षणाबद्दल सुप्रिम कोर्टाचा निकाल धक्कादायक आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!! असे म्हणत या मराठी दिग्दर्शक केदार शिंदे याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

 सर्वोचच्च न्यायालयाने सकाळी १०:३० वाजता सुनावणी केली होती. न्यायालयाने निकाल सुनावताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा अहवाल यातून आम्हाला मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचे सांगितले. तसेच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाजत नसल्याचा उल्लेख करत मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

- Advertisement -

हे वाचा-  अभिनेत्री रुचिताने बांधली लग्नगाठ, संगीत कार्यक्रम रद्द करुन खेड्यातील लोकांना तांदूळ-डाळीचं वाटप..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -