सुप्रिया पाठारेंच्या मुलाचा ठाण्यातील कोकणीपाडा येथे पावभाजीचा ट्रक

नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्याने हा फूड ट्रक चालू केला आहे. त्याच्या या फूड ट्रकवर 'मharaj' असं लिहिलं आहे. सध्या या ट्रकचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

मनोरंजनसृष्टीतील कलाकार आपल्या आवडीने या क्षेत्राची निवड करतात. कधी कधी त्यांची मुलेही आपल्या आई-वडीलांप्रमाणे त्यात क्षेत्रात करिअर करण्याचा आवड दाखवतात. मात्र, अशी सुद्धा अनेक कलाकारांची मुलं आहेत, जे मनोरंजन क्षेत्रात करिअर न करता वेगळ्या क्षेत्राची निवड करतात. सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने देखील स्वताःच्या आवडीचे वेगळे क्षेत्र निवडले आहे.

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये तसेच विनोदी कार्यक्रमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर ह्याने आई प्रमाणे अभिनय क्षेत्राची निवड न करता. त्याने ठाण्यामध्ये खाद्य पदार्थाचा एक ट्रक लावला आहे. ज्यात तो स्वतः पावभाजी बनवतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्याने हा फूड ट्रक चालू केला आहे. त्याच्या या फूड ट्रकवर ‘मharaj’ असं लिहिलं आहे. सध्या या ट्रकचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा ट्रक ठाण्यातील कोकणीपाडा येथे लावला जातो. खरंतर सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिरने अमेरिकेत असताना शेफ म्हणून काम केले आहे, तसेच तो सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या खाना खजाना या कार्यक्रमामध्ये देखील दिसला होता. भारतात परताल्यावर मिहिरने स्वताःचा छोटा व्यवसाय करायला सुरूवात केली आहे.

दरम्यान, फक्त सुप्रिया पाठारेंचाच मुलगा नाही तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मुलगा देखील शेफ आहे. तर अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी पायलेट आहे.


हेही वाचा :पाहा! सुष्मिता सेनच्या मालदीवमधील मादक अदा