घरमनोरंजनसुप्रिया सुळे आहेत 'या' अभिनेत्याच्या फॅन

सुप्रिया सुळे आहेत ‘या’ अभिनेत्याच्या फॅन

Subscribe

राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या जरी उत्तम राजकारणी असल्यातरी त्यांची मनोरंजनसृष्टीबाबत असलेली आवड अनेकदा पाहायला मिळते. सुप्रिया सुळे आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून अनेकदा चित्रपट आणि वेब सीरिज पाहणं पसंत करतात. दरम्यान, याबाबतीत आणखी एक किस्सा समोर आला आहे. जो समजल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सुप्रिया सुळे यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचं नाव घेतलं शिवाय त्यातील अभिनेता पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचे देखील कौतुक केले.

- Advertisement -

या वेब सीरिजमध्ये कालिन भैय्या ही भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठींचा अभिनय त्यांना प्रचंड आवडला. त्यांच्या भूमिकेला पाहून त्यांनी थेट पंकज त्रिपाठीचा नंबर मिळवला आणि त्यांना थेट मॅसेज केला. त्यावेळी आपल्याशी बोलण्यासाठीचा योग्य वेळ काय? असा मॅसेज त्यांना केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

त्यानंतर वेब सीरिजमध्ये तुम्ही अप्रतिम अभिनय केला असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंकज त्रिपाठी यांचे कौतुक केले. तसेच पंकज त्रिपाठी देखील त्यांचे आभार मानत म्हणाले की, मी बारामतीला येऊन गेलोय’, यावर सुप्रिया सुळे खूश झाल्या. वेळ मिळाल्यास आपण नक्की भेटू असं आश्वासन त्रिपाठी यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं. यावेळी एक नेता नव्हे, तर सुप्रिया सुळे यांच्यातली चाहती आनंदानं हुरळून गेली होती. असं त्या म्हणाल्या.

- Advertisement -

 


हेही वाचा :

शाहीर शेखबाबत धक्कादायक घटना; पत्नी अन् मुलगी थोडक्यात बचावल्या

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -