Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere लवकरच!

सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere लवकरच!

कार्यक्रमाच्या Grand Premiere मध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना आनंद नक्कीच मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

ज्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम म्हणजे सूर नवा ध्यास नवा… यावर्षी कार्यक्रमाचे चौथं पर्व असून मेगा ऑडिशन्स पार पडल्या. ज्यामध्ये आपल्याला एक से बडकर गाणी ऐकायला मिळाली होती या ऑडिशनमधूनच महाराष्ट्राला मिळाल्या १६ गायिका.. आता या १६ गायिकांमध्ये विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द रंगणार आहे. येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची कार्यक्रमाचा grand premiere कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाच्या Grand Premiere मध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना आनंद नक्कीच मिळणार आहे. पण तोच आनंद द्विगुणीत होणार आहे कारण, अवधूत गुप्ते यांचा धमाकेदार परफॉर्मन्स देखील असणार आहे.

 अवधूत गुप्ते यांनी नाच ग घुमा, परी म्हणू की अप्सरा आणि डिपाडी डिपांग गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच सोबत आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या गोड आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सावनी रविंद्रला 67व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला असून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर तिचा सत्कार करण्यात आला.


- Advertisement -

हे वाचा- तुफान’मध्ये फरहान अख्तरसोबत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

- Advertisement -