घरमनोरंजनआता 'लिटील चॅम्प्स' च्या सुरांची जादू मराठीत

आता ‘लिटील चॅम्प्स’ च्या सुरांची जादू मराठीत

Subscribe

बच्चे कंपनीच्या सुरांची जादू लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावर सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा दुसरा सीजन येत असून हे लिटील चॅम्प्स विशेष पर्व असणार आहे.

गाण्यांच्या कार्यक्रमांची रेलचेल छोट्या पडद्यावर नेहमीच पाहायला मिळते. येत्या काही दिवसांतच बच्चे कंपनीचे सूर प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहेत. कलर्स मराठी चॅनेलवर पुन्हा एकदा ‘सूर नवा ध्यास नवा’ चे दुसरे पर्व सुरू होत असून यंदा हा ‘लिटील चॅम्प्स’ सीजन असणार आहे. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेणार असून राज्यात ६ जुलैपासून विविध भागांमध्ये याचे ऑडिशन्स होणार आहेत. याही पर्वाचे परीक्षक संगीत क्षेत्रातील दिग्गज अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे असणार आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार हे सध्या गुलदसत्यात आहे.

पहिला पर्व ठरला यशस्वी 

aniruddha-joshi
पहिल्या पर्वाचा विजेता अनिरुद्ध जोशी

‘सूर नवा…’ चा पहिला सीजन खूपच लोकप्रिय झाला होता. त्या पर्वातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आजही या मैफिलीच्या चर्चा नाक्यांनाक्यावर रंगतात. प्रत्येक भागात आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी प्रेक्षकांना दिला होता. त्याच्या पहिल्या पर्वाचा विजेता गायक अनिरुद्ध जोशी बनला होता. अंतिम टप्प्यात शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर या टॉप ५ स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा रंगली होती.

ऑडिशन्सचे टाइमटेबल

  • ६ जुलै – गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी
  • ७ जुलै  – देवल क्लब, कोल्हापूर
  • ८ जुलै  – डी. इ. एस. सेकंडरी स्कूल, पुणे
  • ११ जुलै – सुयोग मंगल कार्यालय, नागपुर
  • १४ जुलै – आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (अॅशलेन), मुंबई
  • १५ जुलै – ब्राम्हण महाविद्यालय, ठाणे
  • १७ जुलै – शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद
  • १८ जुलै – रुद्र इंटरनॅशनल स्कूल, नाशिक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -