घरमनोरंजन'क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?' अभिनेत्री सुरभि ज्योती देणार बहुचर्चीत प्रश्नाचे...

‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?’ अभिनेत्री सुरभि ज्योती देणार बहुचर्चीत प्रश्नाचे उत्तर

Subscribe

टेलिव्हिजवरील(Television) लोकप्रिय अभिनेत्री सुरभि ज्योतीने(Surabhi Jyoti) बॉलिवूडमध्ये (bollywood)पदार्पण केलं आहे.छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची भूरळ प्रेक्षकांच्या मनावर पाडल्यानंतर आता सुरभी बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवण्यास सज्ज होत आहे. ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?'(kya meri sonam gupta bewafa hai) या सिनेमात सुरभी झळकणार आहे. सौरभ त्यागी(saurabh tyagi) यांच्या दिग्दर्शना अंतर्गत तयार झालेल्या या सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. हा एक रोमँटींग ,कॉमेडी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.(surabhi jyoti debut in bollywood movie kya meri sonam gupta bewafa hai)

आपल्या बॉलिवूड डेब्यू बाबत माहित देताना सुरभी म्हणाली की, सोनम गुप्ता बेवफा है लिहलेली एका नोटीचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर पहिल्यांदा मला सिनेमाची कथा ऐकवण्यात आली होती. तेव्हा वाटले की भारतातील इतक्या व्हायरल,लोकप्रिय मीमवर पहिल्यांदा एखादा सिनेमा तयार होत आहे. या सिनेमात काम करताना मला खूप आनंद होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

- Advertisement -

‘क्या सोनम गुप्ता बेवफा है’ हा सिनेमा एका लहानश्या खेड्यातील सिंटू या मुलवार आधारीत आहे. हा मुलगा सोनम गुप्ता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. सोनम गुप्ता एक आगळी वेगळी मुलगी असते. एके दिवशी ती सिंटूला सोडून जाते. यानंतर सिंटू खूप दुखी होतो. पुढे सिनेमात गंमतीशीर कथेला सुरूवात होते. सिनेमात पंजाबी अभिनेता जसी गिल सुद्धा झळकणार आहे. येत्या 10 सप्टेंबरला सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


हे हि वाचा- हॉलिवूड सिनेमासाठी दीपिका अभिनयासोबत दिसणार निर्मितीतही

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -