HomeमनोरंजनSuraj Chavan : सुरज चव्हाणच्या झापूक झुपूकची रिलीज डेट जाहीर

Suraj Chavan : सुरज चव्हाणच्या झापूक झुपूकची रिलीज डेट जाहीर

Subscribe

‘बिग बॉस मराठी सिझन 5’चा विजेता सूरज चव्हाण लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक केदार शिंदेच्या आगामी चित्रपट ‘झापूक झुपूक’मध्ये सुरजची ग्रँड एंट्री झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरसोबत केदार शिंदेने चित्रपटाची रिलीज डेटसुद्धा जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची आणि सुरजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. जिओ स्टुडिओजच्या सोशल मीडिया हॅण्डलवर हे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. (Suraj Chavan film Zapuk Zupuk is releasing soon)

‘झापूक झुपूक’चे मोशन पोस्टर

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला दिग्दर्शक केदार शिंदेने ‘झापूक झुपूक’ या चित्रपटासाठी निवडले. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यानंतर आता सूरज चव्हाणच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याबाबत माहिती देणारे मोशन पोस्टर पहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

या पोस्टरमध्ये सुरज चव्हाणचा देसी लूक एकदम लक्षवेधी आहे. गळ्यात चैन, हातात अंगठ्या, मनगटावर घड्याळ, डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर मोठे हसू असा काहीसा सुरजचा हा लूक आहे.

कधी होणार प्रदर्शित?

जिओ स्टुडिओ मराठीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सूरज चव्हाणचा चित्रपटातील लूक पहायला मिळतोय. सोबतच ‘झापुक झुपूक’ हा मराठी चित्रपट येत्या 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे यात सांगितले आहे. ही पोस्ट जिओ स्टुडिओजने दिग्दर्शक केदार शिंदे आणि सुरज चव्हाणला टॅग केली आहे. पोस्टरमध्ये त्याच्या शेजारी दोन डॉल्बी आहेत आणि झापुक झुपूक असे ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जिओ स्टुडिओजने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘करूया श्रीगणेशा, माघी गणपतीच्या मुहूर्तावर. बाप्पाच्या आशीर्वादाने येतोय. तुमच्यातलाच माणूस, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, 25 एप्रिल पासून, झापुक झुपूक’.

‘झापूक झुपूक’विषयी अधीक सांगायचे म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेने केले आहे. तर निर्मिती ज्योती देशपांडे आणि बेला केदार शिंदेने केले आहे. या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, जुई भागवत हे कलाकार दिसणार आहेत. सूरज चव्हाणच्या या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून पोस्टरवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला जातोय.

हेही पहा –

Ghajini 2 : गजनी 2 येणार? अल्लू अरविंद आणि आमीरच्या भेटीनंतर चर्चांना उधाण