घरताज्या घडामोडीलावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह १६ कलाकार राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधणार

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह १६ कलाकार राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधणार

Subscribe

आपल्या अदानी घायाळ करणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकर आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. सुरेखा पुणेकर १६ कलाकारांसह राष्ट्रावादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावर बांधणार आहेत. १६ सप्टेंबरपासून सुरेखा पुणेकर राजकीय फड गाजवणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सुरेखा पुणेकर काय म्हणाल्या? 

‘चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. मी आतापर्यंत कलेची सेवा केली. आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरीबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. तेव्हा १६ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे’, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

यापूर्वी लोकसभा निवडणुकीपासूनच सुरेखा पुणेकर निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेसने तिकीट दिले नाही, त्यामुळे सुरेखा पुणेकर लोकसभा निवडणूक लढवू शकल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळेस सुरेखा पुणेकरांना भाजपकडून तिकीट देणार असल्याचे म्हटले जात होते. मोहोळ किंवा पुणे शहरातील मतदारसंघातून राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे जाहीर केले होते.

सुरेखा पुणेकर यांनी मराठमोळ्या लावणीला सातासमुद्रापार मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. शाळेच पुस्तक हातात न घेता त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी पायात घुंगरू बांधले. ‘या रावजी’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘कारभारी दमानं’ अशा अनेक लावण्या त्यांच्या गाजल्या आहेत. तसेच त्यांनी मराठी बिग बॉसमध्ये देखील प्रवेश केला होता. शिवाय त्यांनी अनेक शोमध्ये परीक्षक म्हणूनही सहभाग घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला होणार अटक?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -