Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन लोकांवर पुन्हा चढेल का हिमेशचा 'सुरूर'? हिमेशचं 'सुरूर2021' सॉन्ग रिलीज

लोकांवर पुन्हा चढेल का हिमेशचा ‘सुरूर’? हिमेशचं ‘सुरूर2021’ सॉन्ग रिलीज

हिमेशने संपूर्ण गाण्यात सुपरस्टार दिसण्याचा प्रयत्न केला आहे. जवळ-जवळ 7 मिंनट 11 सेकेंड इतका वेळ हे गाण दाखवण्यात आलं आहे.

Related Story

- Advertisement -

दिगज्ज गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याचे ‘सुरूर 2021’ हे गाण रिलीज झाले आहे. Himesh Reshammiya Melodies या युट्यूब चॅनलवर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हिमेश रेशमियायाने पुन्हा आपल्या जुन्या अंदाजात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण रिलीज होताच याला अल्पवधीतच हजारो लाईक्स आणि व्हयूव्स मिळाले आहे. हिमेशच्या या अंदाजाला चाहते पुन्हा पसंत करतात की नाही हे काही वेळातच समोर येईल. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी खूप पैसा खर्च करण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे. तसेच या सॉन्ग मध्ये अभिनेत्री उदिति सिंगची वर्णी लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

- Advertisement -

नेटकर्‍यांच्या या सॉन्गला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. हिमेशने संपूर्ण गाण्यात सुपरस्टार दिसण्याचा प्रयत्न केला आहे. जवळ-जवळ 7 मिंनट 11 सेकेंड इतका वेळ हे गाण दाखवण्यात आलं आहे. चाहत्यांना हिमेशच्या या नवीन गाण्याचा सुरूर पुन्हा चढेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास सध्या हिमेश सिंगिग रियालिटी शो ‘इंडियन आईडल’ मध्ये जजच्या खुर्चीवर विराजमान आहे. तसेच हिमेशने तेरे नाम, आशिक बनाया आपने, अक्सर आणि किक सिनेमाला म्युझिक दिले आहे. झलक दिखला जा, मुझे याद सताए तेरी ,हुक्का बार हे हिमेशच्या काही गाजलेले सॉन्ग आहेत. यानंतर हिमेशने अभिनय क्षेत्रातही आपले नशीब अजमावले. 2007 मध्ये ‘आप का सुरूर’ या सिनेमातून त्याने अॅक्टिंगमध्ये डेब्यु केला होता. पण प्रेक्षकांना त्याच्या अभिनय काही फारसा पसंत पडला नाही.


- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

- Advertisement -