घर मनोरंजन 'दगडी चाळ २' मध्ये पुन्हा झळकणार सूर्या आणि सोनलची प्रेमकथा

‘दगडी चाळ २’ मध्ये पुन्हा झळकणार सूर्या आणि सोनलची प्रेमकथा

Subscribe

दगडी चाळ २'मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’दगडी चाळ २’ ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते नवे चेहरे झळकणार ? हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्याबरोबर ‘दगडी चाळ २’मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगा म्हणजेच अंशुमन देखील पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे. पोस्टरखाली “धागा धागा विणलेल्या नात्याची…दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची…उलगडत आहे गोष्ट पुन्हा…! ‘दगडी चाळ २’१८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!” असं कॅप्शन पूजाने लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

- Advertisement -

तर दुसऱ्या पोस्टरमध्ये अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. या पोस्टरखाली “माझा Daddy सुपरहिरो आहे..! I LOVE YOU DADDY..!!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘दगडी चाळ २’ मध्ये मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येतील.


हेही वाचा :एसएस राजामौलींच्या घरी पोहोचले अनुपम खेर; राजामौली यांचा शाल देऊन सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -