घरमनोरंजनदीपिकाचे नाव ड्रग केसमध्ये समोर आल्यानंतर ट्रोल होतोय रणवीर सिंह

दीपिकाचे नाव ड्रग केसमध्ये समोर आल्यानंतर ट्रोल होतोय रणवीर सिंह

Subscribe

बर्‍याच लोकांनी रणवीरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते मीम अंतरंगी असल्याचे दिसतेय. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल सर्वात महत्वाचा ठरला आहे. एनसीबीने बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना समन्स पाठविले असून लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे. मात्र या प्रकरणाचे सोशल मीडियावर याविषयी चांगलीच चर्चा सुरू असून सोशल मीडियाच्या दुनियेत मीम व्हायरल होताना दिसत आहे.

या वादात दीपिका पादुकोणचे नाव समोर आले तसेच सोशल मीडियावर दीपिकाचा नवरा अभिनेता रणवीर सिंह सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्याचे दिसतंय. यामध्ये एका युझरने रणवीर सिंहच्या ड्रेसिंग स्टाईलवर प्रश्न उपस्थितीत केला तर कोणी दीपिकाच्या डिप्रेशनवर टीकाही केली. बर्‍याच लोकांनी रणवीरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते मीम अंतरंगी असल्याचे दिसतेय.

- Advertisement -

एका यूजरने असेही म्हटले – ड्रग्स ने बना दी जोड़ी. तर दुसर्‍या यूजरने दीपिकाच्या शैलीत लिहिले- ‘मेरे बाद रिपीट कीजिए, सेलेब्स सिर्फ हमें मैनिपुलेट करते हैं. कोकीन कोई खाने की चीज नहीं है, मेरे बाद रिपीट कीजिए.’तर काही मीममधून असेही सांगितले गेले की, दीपिकाकडून रणवीरने ड्रग्स घेण्याचे प्रशिक्षण घेतले असावे.

- Advertisement -

या प्रकरणी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने समन्स बजावली आहे. मंगळवारी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपिका आणि आणि करिश्मा प्रकाश यांच्यातील २८ ऑक्टोबर २०१७ रोजीचे चॅट समोर आले आहे. यात ड्रग्जसंबंधीचा संवाद पाहायला मिळत आहे.


दीपिका पादुकोणवर नेटिझन्स पेटले; एक सो एक मीम्स व्हायरल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -