घरताज्या घडामोडीसुशांतने केदारनाथच्या शुटींगवेळी साराबरोबर घेतले होते ड्रग्ज, रियाने केले असे अनेक खुलासे!

सुशांतने केदारनाथच्या शुटींगवेळी साराबरोबर घेतले होते ड्रग्ज, रियाने केले असे अनेक खुलासे!

Subscribe

सध्या रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात भायखळा कारागृहात आहे. NCB च्या चौकशीत रियाने सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचं आणि त्याच्यासाठी व्यवहार केल्याचं मान्य केलं. ती स्वत: ड्रग्ज पेडलर्सशी संपर्क करायची आणि भाऊ शौविक चक्रवर्ती आणि दिपेश सावंत यांच्यातर्फे पेडलर्सना पैसे द्यायची. चौकशी दरम्यान रियाने काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

रिया चक्रवर्तीने चौकशी एनसीबीला सांगितले की, ड्रग्ज हे नेहमी दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडाजवळ असायचे. सुशांत कधीच स्वत: जवळ ड्रग्ज ठेवायचा नाही. ते रोज सुशांतला रोल करून जॉइन्ट द्यायचे. रियाने ग्रुपवर सुशांतसाठी रोल करून द्या असे ऑर्डर दिले होते. याशिवाय दिपेश सावंतनेही आपल्या जबाबात मान्य केलं की तोच सुशांतला जॉइन्ट्स करून द्यायचा. पुढे बोलताना रिया म्हणाली, सुशांतला कायम भिती वाटायची नारकोटिक्स आणि पोलिसांची. यासाठी सुशांत आणि मी वेगवेगळ्या गाडीतून प्रवास करायचो. आणि मागून जी गाडी यायची त्यात ते ड्रग्ज असायचे. कारण जर पोलिसांनी चौकशी केली तर हे दोघं न अडकता मागची गाडी अडकेल.

- Advertisement -

सुशांत कधीही ड्रग पेडलरला स्वतःहून फोन करायचा नाही. यासाठी तो रियाला, शौविक किंवा त्याच्या स्टाफला बोलायला सांगायचा. जबाबात रियाने स्पष्ट केलं की, सुशांतचा फोन आता तिच्याकडे नाही. त्यामुळे याबद्दल ती अधिक टिप्पणी करू शकत नाही. जेव्हा सुशांतला ड्रग्ज हवे असायचे तेव्हा तो दीपेश सावंत किंवा सॅम्युअल मिरांडाला सांगायचा.

रियाने आपल्या जबाबात सारा अली खानचं नाव घेतं म्हटलं की, सुशांत आधीही ड्रग्ज घेत होता. पण ‘केदारनाथ’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याने हेवी डोस घेतला. यानंतर त्याचं अमली पदार्थांचं सेवन करणं उत्तरोत्तर वाढत गेलं.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘या’ चित्रपटासाठी अक्षयने मोडला १८ वर्षापूर्वीचा नियम!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -