sushant sing suicide-सुशांतच्या खात्यातून ‘जादूटोण्या’ साठी काढले गेले पैसे

बॉलीवूडस्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात पाटणा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर हे हायप्रोफाईल प्रकरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणात महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीही गुंतल्याची चर्चा सुरू असतानाच सुशांतच्या बँक खात्यातून ‘पूजाअर्चा’ करण्यासाठी करोडो रुपये काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र हे पैसे पूजेसाठी नाही तर जादूटोणा करण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात रियाने सुशांतकडून करोडो रुपये उकळल्यापासून त्याच्यावर जादूटोणा केल्याचाही आरोप आहे. यासंदर्भात सुशांतच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात येत आहे. कोटक महिंद्रा बँकेत सुशांतचे खाते आहे. त्यातून गेल्यावर्षी पाचवेळा पूजेच्या नावाखाली करोडो रुपये काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सुशांतची बँक डिटेल्स

१४ जुलै २०१९– ४५,००० रुपये

२२ जुलै २०१९– ५५,००० रुपये, ३६,००० रुपये

२ ऑगस्ट २०१९– ८६,००० रुपये

८ ऑगस्ट २०१९– ११,००० रुपये

१५ ऑगस्ट १०१९- ६०,००० रुपये

विशेष म्हणजे ज्या पूजेच्या नावाखाली ही रक्कम काढण्यात येत होती. ती पूजा कधीही झालेली नाही. पण ऑगस्टनंतर खात्यातून पूजेसाठी कुठलीही रक्कम काढण्यात आलेली नाही.

दरम्यान, या महितीबरोबरच सुशांतच्या सीए संदीप श्रीधर यांनी अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.
त्यानुसार सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत त्याच्या खात्यातून काढण्यात आलेल्या ज्या रकमेचा उल्लेख केला आहे. तेवढ्या रकमेचे व्यवहार कधीही त्याच्या खात्यातून झालेले नाहीत. कारण तेवढे पैसे कधीही त्याच्या खात्यात नव्हते. तसेच सुशांतच्या खात्यातून रियाच्या नावावर जमा करण्यात आलेली हजार रुपये फि आणि रियाच्या आईने जमा केलेले ३३००० रुपये
यांच्याव्यतिरिक्त सुशांतचे खात्यातून कधीही पैशांचे व्यवहार झालेले नाहीत.

तसेच सुशांत हा फिल्मस्टार होता. त्यामुळे लाईफस्टाईल मेंटेंन करण्यासाठी त्याला खर्च करावा लागायचा. शॉपिंग,घरभाडे आणि प्रवासासाठी तो खर्च करायचा. सुशांत आणि रिया अनेकवेळा बाहेर फिरायलाही जायचे. पण गेल्या वर्षभरात सुशांतची कमाई कमी झाली होती अशीही माहिती श्रीधर यांनी पोलिसांना दिली आहे.