सुशांत राजपूत आणि संजनाचा ‘दिल बेचारा’…

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरूण आदर्श यांनी ट्वीटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबरला 'दिल बेचारा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sushant Singh Rajput and Sanjana Sanghi’s 'Dil bechara' movie release soon
सौजन्य - ट्वीटर
बॉलीवूडमधील लिडींग स्टार सुशांत सिंग राजपूत आणि संजना संघी ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. सुशांत आणि संजना ‘दिल बेचारा’ या आगामी चित्रपटात काम करणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यांच्या या चित्रपटासाठी चाहते भलतेच उत्सुक असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतही होतं. मात्र, ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या रिलीजची तारीख समोर आली नव्हती. मात्र, अखेर या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरूण आदर्श यांनी ट्वीटरवरुन दिलेल्या माहितीनुसार,

प्रदर्शनाआधीच हा चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला होता. बॉलीवूडमध्ये मीटू मोहिमेचं पीक आलेलं असताना या चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. दरम्यान याचवेळी, ‘चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांतनं आपल्यासोबत अतिजवळीक करण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप संजनाने केल्याची चर्चा रंगली होती.  मात्र, नंतर सुशांतने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. या सगळ्या नाट्यावर आता पडदा पडला असून ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.  मुकेश छाब्रांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, यानिमित्ताने सुशांत आणि संजना पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.