घर मनोरंजन Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीच्या भावाला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने दिली...

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीच्या भावाला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ परवानगी

Subscribe

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमध्ये रिया चक्रवर्तीसोबत तिचा भाऊ शोविक याच्या नावाचा देखील समावेश होता. त्यानंतर शोविकचे नावही या प्रकरणात चर्चेत आले होते. आता मात्र मुंबई न्यायालयाकडून त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यांची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री चर्चेत आली होती. सुशांतच्या आत्महत्येसाठी रियावर आरोप करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूप्रकरणात रियाची चौकशीही करण्यात आली होती. त्याच्या लव्ह लाइफबद्दल तेव्हा चर्चा रंगली होती. या प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होत होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमध्ये रिया चक्रवर्तीसोबत तिचा भाऊ शोविक याच्या नावाचा देखील समावेश होता. त्यानंतर शोविकचे नावही या प्रकरणात चर्चेत आले होते. आता मात्र मुंबई न्यायालयाकडून त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. (Sushant Singh Rajput Case Big relief for Rhea Chakraborty s brother shovik The High Court gave permission)

रियाचा भाऊ शोविकला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शोविकला आता परदेशात जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.

- Advertisement -

यापूर्वी रिया आणि तिच्या कुटुंबीयांना पासपोर्ट वापरण्याची परवानही नव्हती, असा आदेशच न्यायालयाने दिला होता. आता शोविकला अनेक अटींवर कामासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, ज्यात त्याच्या पालकांचे पासपोर्ट अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत.

सुशांत सिंह राजपूर ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स विभागाने रियाप्रमाणेच शोविकचं नावही आरोपी म्हणून सांगितलं होतं. त्याचा ड्रग्ज विक्रेत्यांशी संपर्क होता आणि सुशांतला देण्यासाठी तो ड्रग्ज घ्यायचा असा आरोप त्याच्यावर होता. त्यानंतर न्यायालयाने शोविकला परदेशात जाऊन त्याचा पासपोर्ट वापरण्याची परवानगी नाकारली होती.

- Advertisement -

आत शोविकला अलीकडेच 17 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 7 दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला जायचं होतं त्यामुळे आता त्यासाठी न्यायालयाने शोविकला परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.

(हेही वाचा: Singham Again चे शूटिंग सुरु , अक्षय कुमारने लिहिली ही खास पोस्ट )

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. जेव्हा सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी रियाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि मनी लॉंड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शोविक यांना सप्टेंबर 2020 ला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना जामीन देण्यात आला होता.

- Advertisment -