घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरे आणि रिया यांचा एकमेकांशी संबंध आहे का? वकिलांनी केला खुलासा!

आदित्य ठाकरे आणि रिया यांचा एकमेकांशी संबंध आहे का? वकिलांनी केला खुलासा!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले जात आहे. मात्र यावर आता रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘रिया आदित्य ठाकरेंना कधीच भेटली नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत इतकंच तिला ठाऊक आहे’, असं रियाचे वकिल म्हणाले आहेत.

वकिल सतीश मानशिंदे यांनी अधिकृत स्टेटमेंट जाहीर केला आहे. त्या स्टेटमंटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘रिया आदित्य ठाकरेंना ओळखत नाही आणि ती कधीच त्यांना भेटली नाहीये. ना कधी फोनवरून किंवा इतर कोणत्या माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. ती त्यांच्याशी आत्तापर्यंत अजिबात बोलली नाहीये. तर अभिनेता डिनो मोरियाला रिया ओळखत असून इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून काही कार्यक्रमांमध्ये दोघांची भेट झाली होती.’

- Advertisement -

याचबरोबर तीच्या वकिलांनी पुढे म्हटलं आहे की,  ‘रियाला मुंबई पोलीस व ईडीने समन्स बजावले होते. तिला बोलावण्यात आलेल्या सर्व तारखांना ती ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित होती. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीने रियाचा फोन, लॅपटॉप आणि तिचा डीएनएसुद्धा घेतला आहे. यासोबतच तिचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मुंबई पोलीस व ईडीने घेतले आहेत. पोलिसांच्या तपासाचा अहवाल सुप्रीम कोर्टाला सुपूर्द करण्यात आला आहे.

त्याचबरोबर या स्टेटमेंटमध्ये वकिलांनी रियाच्या आणि सुशांतच्या संबंधां विषयी म्हटलं आहे की, एप्रिल २०१९ मध्ये एका पार्टीला रिया व सुशांतने हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघं डेट करू लागले. डिसेंबर २०१९ ला रिया सुशांतच्या घरी रहायला गेली. ८ जून २०२० पर्यंत रिया व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. ८ जून रोजी रियाने सुशांतचं घर सोडलं.

- Advertisement -

हे ही वाचा – क्षुल्लक वादातून पतीने केले पत्नीचे सहा तुकडे, एका बीलामुळे पकडला गेला!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -