घरताज्या घडामोडीsushant singh rajput death anniversary: युरोपच्या ट्रिपमध्ये असे काय घडले, ज्यानंतर बदलला...

sushant singh rajput death anniversary: युरोपच्या ट्रिपमध्ये असे काय घडले, ज्यानंतर बदलला सुशांत

Subscribe

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनला (sushant singh rajput death anniversary) आज एक वर्ष लोटले. मागच्या वर्षी २०२०मध्ये आजच्या दिवशी दुपारी सुशांत सिंह राजपूतने या जगाचा निरोप घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता. सुशांतसारखा व्यक्ती आत्महत्या कसा करू शकतो? असा सगळ्यांना प्रश्न पडू लागला. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर चौकशी झाली आणि यादरम्यान सुशांत संबंधित बरेच खुलासे झाले. यामध्ये सुशांतच्या युरोप ट्रिपचा देखील खुलासा झाला होता, ज्यानंतर सुशांत बदलला होता. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने जबाबामध्ये सांगितले होते की, युरोप ट्रिपहून परतल्यानंतर सुशांत पूर्णपणे बदलला होता. आज आम्ही तुम्हाला सुशांतच्या या ट्रिपमध्ये नक्की काय झाले होते, हे सांगणार आहोत.

युरोप ट्रिपला केव्हा गेले होते?

सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती ऑक्टोबर २०१९मध्ये युरोप ट्रिपला गेले होते. या ट्रिपला रियाचा भाऊ शौविक देखील त्यांच्यासोबत होता. युरोप ट्रिपदरम्यान ते इटलीमध्ये ६०० वर्ष जुन्या हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलच्या खोल्या खूप मोठ्या होत्या आणि भिंतीवर जुन्या पेंटिंग्स होत्या. रियाच्या मते, सुशांत या पेंटिंग्स पाहून घाबरला होता आणि विचित्र व्यवहार करू लागला.

- Advertisement -

रियाने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या खोलीत एक पेंटिंग टांगली होती. या पेंटिंगमध्ये सॅटर्न आपल्याच मुलाला खात होता. रिया यावेळेस आपल्या भावासोबत दुसऱ्या खोलीत राहत होती. जेव्हा सुशांतच्या खोलीत परतली तेव्हा सुशांत रुद्राश्र घेऊन मंत्रांचा जप करत होतो आणि खूप घाबरला होता. जेव्हा रियाने त्याला काय झाले असे विचारले, तेव्हा तो म्हणाला की, तो पेंटिंगमधील कॅरेक्टर्सना पाहत आहे. रियाच्या मते, सुशांतला पेंटिंगमुळे विचित्र गोष्टी दिसत होत्या. परंतु सुशांत व्यवस्थित सांगू शकत नव्हता. त्या दिवशी रिया आणि शौविक त्याच्या खोलीत झोपले. रियाने सांगितले की, सुशांतला पेंटिंगबाबत भ्रम निर्माण झाला होतो आणि त्यांनी त्याला कसेबसे समजवले की, हा फक्त भ्रम आहे बाकी काही नाही.

यानंतर सुशांतसोबत रिया ऑस्ट्रियामध्ये डेटॉक्स सेंटरवर देखील गेली. परंतु सुशांत तिथेही ठिक वाटत नव्हता आणि तो निघून गेला. याबाबत रियाने सांगितले की, २ नोव्हेंबरला ते परतणार होते, पण २८ ऑक्टोबरला ते परतले. या ट्रिपवरून परतल्यानंतर सुशांतची एनर्जी एकदम कमी झाली होती. तो तासांतास गप्प बसत होता. मुंबईत आल्यानंतर त्याची प्रकृती आणखीन खालावली. तो कधी किंचाळत असे तर कधी रडात असे.

- Advertisement -

पेंग्टिंग मागचा नेमका अर्थ काय होता?

रिया ज्या पेंटिंगचा दावा करत होती ते फ्रान्सिस्को गोया स्पॅनिश आर्टिस्टचे आहे. या पेंटिंगमध्ये ग्रीक गॉड सॅटर्न (शनी) आपल्या मुलाला खाताना दिसत आहे. या पेंटिंगला Saturn Devouring his son असे नाव देण्यात आले आहे. ग्रीकच्या एका पौराणिक कथेवर आधारित हे पेंटिंग असून Titan Cronus हे पेंटिंग आहे. ग्रीक भाषेत त्याला सॅटर्न (शनी) असे म्हटले जाते. त्याला भीती वाटत होती की, त्याचा स्वत:चा मुलगा त्याला राजगादीवरून पायउतार करेल. या भीती पोटी तो स्वत:च्याच मुलाला खात आहे, असे हे पेंटिंग दाखवण्यात आले आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -