घरताज्या घडामोडीचाहत्यांनो सुशांतचा शेवटचा चित्रपट आज 'या' वेळेत होणार प्रदर्शित!

चाहत्यांनो सुशांतचा शेवटचा चित्रपट आज ‘या’ वेळेत होणार प्रदर्शित!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २४ जुलै म्हणजेच आज संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र लॉकडाउनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

- Advertisement -

काय आहे चित्रपटाची कथा

किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कँन्सरग्रस्त आहे. मॅनीच क्रिझीवर मनापासून प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. संजनाचा हा पहिलाच चित्रपट आहे.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.

- Advertisement -

हे ही वाचा- पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करणाऱ्या आजीला रितेशची मदत!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -