घरताज्या घडामोडीसुशांतच्या मृत्यूप्रकरणी गर्लफ्रेंड रियाची अमित शहांकडे CBI चौकशीची मागणी

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी गर्लफ्रेंड रियाची अमित शहांकडे CBI चौकशीची मागणी

Subscribe

रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे CBI चौकशीची मागणी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत असून गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या जवळच्या व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची देखील चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे CBI चौकशीची मागणी केली आहे. रियाने ट्विट करुन पहिल्यांदाच सांगितले आहे की, ‘मी सुशांतची गर्लफ्रेंड आहे’.

काय म्हणाली रिया चक्रवर्ती?

रिया चक्रवर्तीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आदरणीय अमित शहाजी, मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आहे. सुशांतला जाऊन आता एक महिना झाला आहे. तसेच माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. पण, मी सुशांतला न्याय मिळावा याकरता तुमच्याकडे हात जोडून मागणी करते की, याप्रकरणी सीबीआयची चौकशी करावी. कारण मला जाणून घ्यायचे आहे की, सुशांतने एवढे गंभीर पाऊल का उचले आहे’?

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे चाहते रियाला दोष देत आहेत. तसेच रियाला सुशांतच्या अंत्यसंस्काराच्या वेळी येण्यात देखील रियाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे सुशांतच्या मृत्यूनंतर एक महिन्यानंतर रिया सोशल मीडियावर आली आहे.


हेही वाचा – म्हणून ‘प्रेम पॉयजन पंगा’ ही मालिका कलाकारांनी सोडली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -