घरताज्या घडामोडीयुरोप टूरमध्ये सुशांतला भयंकर चित्र दिसलं आणि त्याची तब्येत बिघडू लागली, रियाने...

युरोप टूरमध्ये सुशांतला भयंकर चित्र दिसलं आणि त्याची तब्येत बिघडू लागली, रियाने केले धक्कादायक खुलासे!

Subscribe

सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसलं होतं त्यामुळे तो नैराश्यात गेला असा खुलासा रिया चक्रवर्तीने केला आहे. रियाने २०१९ च्या युरोप टूरमध्ये काय घडलं ते सांगितलं आहे.

रिया म्हणाली, ऑक्टोबर २०१९ मध्ये मी सुशांत आणि माझा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोप टूरला गेलो होतो. त्यावेळी आम्ही इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील एका ६०० वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेल मध्ये मी आणि शोविक वेगळ्या रुम मध्ये राहिलो होतो तर सुशांत दुसऱ्या रुम मध्ये राहिला होता. काही कामा निमित्त मी आणि शौविक हॉटेल मधून बाहेर गेलो होतो. काही तासांनी आम्ही दोघे हॉटेलमध्ये परत आलो तेव्हा सुशांत हॉटेलच्या एका कोप-यात बसून रुद्राक्ष माळेचा जप करत होता. यावेळेस सुशांत खुप घाबरला होता. हे पाहून मी आणि शौविक ने सुशांतला हॉटेलमधल्या रुममध्ये नेलं आणि त्याची अशी अवस्था का झाली याबाबत त्याला विचारणा केली. तेव्हा सुशांतने सांगितलं, ज्या हॉटेल मध्ये हे आम्ही तिघे थांबलो होतो त्या हॉटेल मध्ये गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराची पेंटीग होती. ज्यात एक राक्षस एका मुलाला खात असल्याचे चित्र काढलं होतं. ती पेंटींग पाहून सुशांत खुप घाबरला होता.

- Advertisement -

त्यानतंर आम्ही लगेच ते हॉटेल सोडले आणि नंतर पुढे आम्ही तिघे ऑस्ट्रियाला गेलो. सुशांतची तब्येत बिघडू लागली होती त्यामुळे आमची युरोप टूर २ नोव्हेंबर २०१९ रोजी संपणार होती ती मध्येच सोडून आम्ही २८ ऑक्टोबरलाच मुंबईला परत आलो. सुशांत घरी गेल्यावरही सतत बेडरूम मध्येच असायचा. अधून मधून सुशांतच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज यायचे.  हे काही दिवस असंच सुरु राहिलं. म्हणून आम्ही मानसोपचार तज्ञांकडे गेलो पण सुशांतला बरं वाटतं नसल्याने आम्ही मानसोपचार तज्ञ बदलत राहिलो.

८ जूनला झालं भांडण

सुशांत भूताच्या घटनेवरून सुशांत खुपच चिडचिड करू लागला होता. तो सतत माझ्याशी भांडायचा. ८ जूनला ही आमचे याच विषयावरून कडाक्याचं भांडण झालं. सुशांतनेच मला त्याच्या घरातून बाहेर पडायला सांगितलं. आणि मी माझी बॅग घेवून सुशांतच्या घरातून निघुन गेली. या सगळ्यामुळे मला ही खुप नैराश्य आले होते म्हणून मी देखील एका मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला. हा जवाब नोंदवत असताना रियाला रडू कोसळलं होतं.

- Advertisement -

हे ही वाचा – सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -