सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘दिल बेचारा’ चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित!

sushant singh rajput sanjana sanghi dil bechara movie best scenes in pics

– बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या २४ तासांमध्ये साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला. सुशांतच्या चाहत्यांची खरतर सुशांतचा शेवटचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा अशी इच्छा होती. पण या लॉकडाऊनमुळे ती इच्छा पुर्ण होऊ शकली नाही. पण आता ही इच्छा काही अंशी पुर्ण झाली आहे कारण हा चित्रपट न्यूझीलंडमधील एका चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

न्यूझीलंडमधील हिंदी रेडिओ चॅनेल ऑकलंड येथील होयत्स चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शितकेला आहे. तसेच न्यूझीलंड हा पहिला देश ठरला आहे जेथे सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच तेथील चाहत्यांनी सुशांतला श्रद्धांजली देखील वाहिली.

भारतात सिनेमागृह बंद असल्यामुळे ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली आहे.  १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिले आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरण

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला उद्या दोन महिने पूर्ण होतील. पण अजूनही सुशांतने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. नुकतीच ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी केली. ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी उघडकीस आल्या. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले याप्रकरण पाटणा येथे एकमेव एफआयआर दाखल झाले आहे. बिहार सरकारच्या सूचनेनुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे.


हे ही वाचा – CBI चौकशी करा, सुशांतला माझ्या मुलीप्रमाणेच मारण्यात आलय, जियाच्या आईने केली मागणी