धक्कादायक! दिशा सॅलिअनच्या आत्महत्येआधीच्या पार्टीचा व्हिडिओ आला समोर

दिशा सालियान

अभिनेता सुशांत सिंह राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. दिशा सालिनने आत्महत्ये आधी एक शेवटची पार्टी केली होती. त्या पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ८ जूनला रात्री ही पार्टी झाली. या पार्टीनंतर लगेचच दिशाने आत्महत्या केली. आत्महत्येच्या एक तासा आधीचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओत दिशा आणि तिचे मित्र डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओत दिशाही मनमुरादपणे डान्स करत आहे. दिशानेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता. तर दुसरीकडे दिशाने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आता आणखी वाढला आहे.

दिशा सॅलियनचा शेवटचा व्हिडिओ

Posted by Marathi Viral News on Saturday, August 8, 2020

रियाच्या आई- वडिलांची प्रतिक्रीया

मात्र आजपर्यंत या प्रकरणात एकदाही प्रतिक्रीया न दिलेले दिशाच्या आई- वडिलांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘माझ्या मुलीला बदनामकरून फायदा उचलू नका, तीच्या मृत्यूशी खेळू नका ती आमची एकूलती एक मुलगी होती. आम्ही आमच्या मुलीला गमावलं आहे. आता जे लोक तीची प्रतिमा मलिन करत आहेत. ते खरतच आम्ची छळवणूक करत आहेत.’

पुढे बोलताना दिशाची आई म्हणाली, मी देशातील लोकांना, मिडीयाला सांगते की या सगळ्या अफवा आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. मी माझ्या मुलीला गमावलं आहे. अशाप्रकारच्या बातम्या एक दिवशी आम्हालाही संपवतील. सुप्रीम कोर्टाने या चर्चांना थांबवायला हवं. अशी आम्ही विनवणी करतो.

दिशावर बलात्कार झालेला नव्हता. आम्ही दोनदा पोलिसांना जवाब दिलेला आहे. मालवणी पोलिसांकडे याचा रेकॉर्ड आहे. आम्ही पोस्टमोर्टम रिपोर्ट पाहिला आहे. मुंबई पोलीस योग्य रितीने काम करत आहेत. त्यांच्यावर माझा विश्वास आहे.