घरताज्या घडामोडीSushant Singh Rajput: 'सुशांतचा खून होण्याची ही आहेत कारणे', सुब्रह्मण्यम स्वामींचे ट्विट

Sushant Singh Rajput: ‘सुशांतचा खून होण्याची ही आहेत कारणे’, सुब्रह्मण्यम स्वामींचे ट्विट

Subscribe

राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुरुवातीपासून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ट्विटरवर काही खुलासे केले होते. सीबीआयला ही केस द्यावी, अशी मागणीही त्यांनीच सुरुवातीपासून लावून धरली होती. आता या प्रकरणात त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. सुशांतची हत्या झाली असून त्याची कारणे स्वामींनी ट्विटरवर सांगितली आहेत. स्वामींचे हे ट्विट सध्या (Sushant Singh Rajput News) ट्रेडिंग विषय असून अनेकांनी या ट्विटवर उड्या टाकत वाद-प्रतिवाद करायला सुरुवात केली आहे. कालच सीबीआयने सुशांतच्या प्रकरणात हत्येचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे स्पष्ट केले होते, हे विशेष.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितले की, “सुशांतचा खून होण्याचे पहिले कारण स्पष्ट आहे. सुशांत एक आत्मनिर्भर आणि बहुगुणी कलाकार होता, ज्यामुळे बॉलिवूड त्याच्याकडे फारकळ दुर्लक्ष करु शकत नव्हते. सुशांतशी स्पर्धा करणे त्यांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी सुशांतला खेळातूनच बाहेर काढले. बाकी जे काही आहे ते बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे आहे.”

- Advertisement -

स्वामींनी सुशांतचा खून होण्याचे दुसरे एक कारण याच ट्विटमध्ये विषद केले आहे. ते म्हणतात की, “दुसरे कारण देखील मी थोड्या दिवसांनी स्पष्ट करेल. कारण ते थोडे राजकीय असल्यामुळे मला त्यावर आणखी संशोधन करावे लागेल.” स्वामींच्या या खळबळजनक ट्विटमुळे पुन्हा एकदा हे प्रकरण तापले आहे. स्वामींनी एक वेगळेच वळण सुशांतच्या मृत्यूला दिले आहे. आता स्वामी दुसरे कारण जे राजकीय असल्याचे सांगत आहेत, त्यामध्ये ते कुणा राजकीय नेत्याचे नाव घेणार का? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

- Advertisement -

सुशांत सिंह प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकणात अमल पदार्थांचा विषय आलेला असून ड्रग्ज माफियांची नावे समोर येत आहेत. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकला ड्रग्ज माफियाशी संपर्क असल्याच्या कारणावरुन अटक देखील होऊ शकते. सीबीआय, ईडी आणि एनसीबी अशा तीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -