Bollywood Drug Probe: सारा, श्रध्दानंतर दीपिकाचे ड्रग्ज कनेक्शन; NCB कडून समन्स?

deepika padukon

सुशांत सिंग राजपुत प्रकरणाचा तपास आता ड्रग्ज अँगलने केला जात आहे. NCB ची टीम या तपासात सक्रीय झाली आहे. आत्तापर्यंतच्या तपासात नारकोटिक्सला मोठं यश मिळालं आहे. एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज सप्लाअर राहिल राफत याला अटक केली आहे.  त्यानंतर आता अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येणार हे निश्चित झालं होतं. त्यात एक धक्कादायक नाव समोर आलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव या प्रकरणात समोर आलं आहे. NCB दीपिकाला समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. या आधी अभिनेत्री सारा अली खान आणि श्रध्दा कपूर या दोघींची नावं समोर आली होती.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव समोर येत आहे. त्यात आता NCB ने दीपिकाला चौकशीसाठी बोलवलं आहे. NCB तपासणीत काही धागेदोरे मिळाले होते. डी आणि के अद्याक्षरे असलेल्या व्यक्तींचा उल्लेख होता. ही ची ओळख दीपिका पदुकोण अशी झाली आहे. तर के जी Kwan टॅलेंट मॅनेजन्मेट एजन्सी कर्मचारी आहे. दीपिका आणि करिश्माची उद्या चौकशी केली जाऊ शकते.

एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज सप्लाअर राहिल राफत याला अटक केली आहे. राहिलची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. राहिलने अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. बॉलिवूडमध्ये राहिलला ‘सॅम ड्रग अंकल’ म्हणून ओळखलं जातं. राहिलचा ‘बॉस’ बॉलिवूडशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा बॉस अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता यांपैकी कोणीही असू शकतो. राहिलच्या माध्यमातून तपास यंत्रणा बॉलिवूडमधील मोठ्या नावांपर्यंत पोहचू शकतात असा एनसीबीचा विश्वास आहे. वृत्तानुसार, राहिलने एनसीबीच्या चौकशीत ज्या व्यक्तीसाठी राहिल काम करतो त्याला ‘बॉस’ या नावाने ओळखतो. ही व्यक्ती एक मोठा ड्रग्ज पेडलर असून स्वतः फिल्म इण्डस्ट्रीशी निगडीत आहे. राहिल आपल्या ‘बॉस’च्या सांगण्यावरून सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवायचा. आता दीपिका नंतर या प्रकरणात आणखी कोणती नावं समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हे ही वाचा – Sushant Suicide case: NCB ने केली ड्रग्ज डिलरला अटक,बॉलिवूड,राजकारणातील अनेक नावं समोर!