घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, फॉरेन्सिक अहवालातून झाला खुलासा!

Sushant Suicide Case: सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, फॉरेन्सिक अहवालातून झाला खुलासा!

Subscribe

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत. पण या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनपर्यंत मिळाली नाही आहेत. सुशांतची हत्या की आत्महत्या?, सुशांतची हत्या झाली तर ती कोणी केली?, सुशांतची हत्या झाली नाही तर आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण काय होतं?, त्याला कोणी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देशातील तीन मोठ्या तपास यंत्रणा शोधत आहेत आणि आता यापैकी एका प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, फॉरेन्सिक अहवालात सुशांतसिंह राजपूतची हत्या केल्याचे नाकारले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, ‘ज्या परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यावरून असे दिसून येते की, कोणत्याही प्रकारचा यामध्ये हत्येचे कट नाही आहे आणि ही आत्महत्येची घटना आहे.’ दरम्यान एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहे.

- Advertisement -

त्यामुळे एम्सचा अहवाल मिळाल्यानंतर आता सीबीआय आत्महत्येच्या अँगलने याप्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यामुळे आता सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्यामागचं नेमकं कारण काय? त्याला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलं? या प्रश्नांची उत्तरं या चौकशीत सापडतील. दरम्यान याप्रकरणात सीबीआयने आरोपी असलेल्या २० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.


हेही वाचा  – नातीने सांगितलेला कोरोनाचा अर्थ ऐकून बिग बी झाले हैराण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -