Sushant Suicide Case: पोलिसांचा उलट तपास सुरु; मोठ्या अभिनेत्याच्या PR ची होणार चौकशी

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद झालेला नाही. उलट पोलीस आता पुन्हा ३५ लोकांचा उलट जबाब नोंदविणार आहेत.

Flash Back 2020: year of warning to Bollywood
Flash Back 2020: बॉलिवूडला इशारा देणारे वर्ष

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला आज एक महिना पुर्ण झाला. १४ जूनच्या रात्री (Sushant Singh Rajput Death Date) सुशांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या एका महिन्यात मुंबई पोलिसांनी विविध अंगाने या प्रकरणाचा तपास केला होता. आतापर्यंत तब्बल ३५ लोकांचे जबाब नोंदविण्यात आले होते. ही आत्महत्या की हत्या? या दिशेनीही पोलिसांनी तपास केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी तपासाची नवी दिशा आखली आहे. मागच्या महिन्याभरात ज्या लोकांचे जबाब नोंदविण्यात आले होते, त्यांना पुन्हा बोलवून उलट तपासणी केली जाणार आहे. तसेच एका मोठ्या अभिनेत्याच्या पीआर देखील नव्याने चौकशीसाठी बोलिवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर अवघे बॉलिवूड आणि चाहता वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. अवघ्या ३४ वर्षाच्या वयात या हरहुन्नरी अभिनेत्याने आत्महत्या केल्यामुळे आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान बॉलिवूडमधील नेपोटिझममुळे सुशांत तणावात होता, त्याला अनेक प्रोजेक्टमधून वगळण्यात आल्यामुळे तो कोषात गेला होता, अशी माहिती समोर आली. त्यामुळे सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले असल्याचाही संशय काहींनी व्यक्त केला होता. पोलिसांनी आपल्या तपासाचा रोख या दिशेनेही करुन पाहिला आहे. (Who killed Sushant Singh Rajput)

हे वाचा – सुशांतच्या मृत्यूनंतर ३० दिवसांनी एक्स गर्लफ्रेंड अंकिताने केली ‘ही’ पहिली पोस्ट

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यानुसार सुशांतने आत्महत्या केली होती, असा प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे. मात्र त्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणात पोलिसांना आणखी पैलू समजू शकतील. तसेच हे प्रकरण अपमृत्यूचे असल्याकारणाने या प्रकरणाची फाईल एकाएकी बंद करता येणार नाही. चौकशीचा अंतिम अहवाल गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांना दिला जाईल. त्यानंतर न्यायालयात अहवाल सादर केला जाईल, त्यानंतरच या प्रकरणावर निर्णय होईल.

तपासाच्या सुरुवातील पोलिसांनी सुशांतचे नातेवाईक, घरातील नोकर आणि मित्र-मैत्रिणींचा जबाब नोंदविला होता. त्यासोबतच बॉलिवूडमधील काही बडे दिग्दर्शक, अभिनेत्यांचे मॅनेजर, पीआर यांनाही चौकशीसाठी बोलाविले होते. आता ३५ लोकांना पुन्हा एकदा उलट तपासणीसाठी बोलविण्यात येणार आहे. जर आधीच्या आणि आता घेतलेल्या नव्या जबाबात तफावत आढळल्यास पोलिसांनी काही नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी आज सुशांतच्या वांद्रे येथील घरातील नोकर नीरज याचा जबाब घेतला आहे. तसेच सुशांतची मोठी बहीण मीतू (Sushant Singh Rajput Sister Mitu singh) हिला देखील आज चौकशीसाठी बोलविले होते. मात्र आज काही कारणांमुळे ती येऊ शकली नव्हती.