घरताज्या घडामोडीSushant Suicide Case; आता NCB सुशांतच्या दोन्ही मॅनेजर्सची चौकशी करणार

Sushant Suicide Case; आता NCB सुशांतच्या दोन्ही मॅनेजर्सची चौकशी करणार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला दोन महिने उलडून गेले आहेत. अजून सुशांतने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे. सध्या सीबीआय, ईडी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) याप्रकरणात चौकशी करत आहे. यादरम्यान अनेक सुशांत संबंधित खुलासे होत आहेत. आता सुशांत प्रकरणासंदर्भात एनसीबीने जया शाह आणि श्रुती मोदी या दोघींनाही उद्याच्या चौकशीत सामील होण्यासाठी समन्स बजावले आहे. उद्या जया शाह आणि श्रुती मोदी यांची चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान उद्या आणखी कोण कोणत्या गोष्टी उघडकीस येतील याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्र येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या अशा एक्झिटमुळे सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित राहू लागले. सुशांतने आत्महत्या केली की तो बॉलिवूडच्या घराणेशाही बळी ठरला अशी एकच चर्चा सुरू झाली. सुशांतच्या प्रकरणामुळे राजकारण तापले. मग हे सर्व प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत ९ सप्टेबरला सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केले आहे. आता एनसीबीकडून सुशांतच्या दोन्ही मॅनजरची चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तर माफी मागेन आणि ट्विटरही सोडेन, कंगनाचं आव्हान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -