Sushant Sucide Case: रियाचं असहकार्य! ईडीच्या प्रश्नावर एकच उत्तर ‘माहित नाही’

रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपुत प्रकरणात प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीची अंमलबजावणी संचलनालयानं चौकशी सुरू आहे. सात तास झाले रियाची चौकशी अद्याप सुरू आहे. ईडीने रियावर मनी लॉड्रिंगचा ठपका ठेवला आहे. मात्र रियाला चौकशीला सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. नुकतीच रियाची मॅनेजर  श्रृती मोदी ८ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडली.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांना रियानं ‘मला माहित नाही’ असं उत्तर दिलं. सुशांत सिंह राजपुतच्या बँक खात्यातून झालेले व्यवहार, दोन फ्लॅटची खरेदी याचा तपास ईडीने सुरू केला आहे. आज रियाला ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. रियाच्या भावाची देखील यावेळी चौकशी करण्यात आली. दोन तास चौकशी झाल्यानंतर तो ईडीच्या कार्यालयातून बाहेर आला. त्यानंतर थोड्या वेळानं तो पुन्हा ईडीच्या कार्यालयात पोहचला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली होती. ती आणण्यासाठी शौविक ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडला होता.

ईडी ३ टप्प्यांमध्ये रियाची चौकशी करणार आहे. रियाची दुसऱ्या टप्प्यातील चौकशी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आज रिया, शौविक आणि सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौकशी करण्यात आली. मात्र रियानं बऱ्याचश्या प्रशांना उत्तर दिलेली नाहीत. रियाकडून ईडीला अनेक प्रश्नांची उत्तर हवी आहेत. मात्र रिया ईडीच्या अधिकाऱ्यांना तपशील माहित नाही अशी उत्तरं देत आहे.

सकाळी रियाने तिच्या वकिलांमार्फत ईडीची चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. सुप्रिम कोर्टातील सुनावणीचा निर्णय येईपर्यंत ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती तिने केली होती. परंतू ईडीने तिची ही मागणी फेटाळली. सीबीआयने गुरूवारी या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती. ज्यामध्ये रियासह ६ लोकांना आरोपी ठरवण्यात आले आहे. चौकशीसाठी सीबीआयने (SIT) एसआयटीची नेमणूक केली आहे. ही टीम गुजरातचे केडर आयपीएस मनोज शशिधर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.


हे ही वाच – Sushant Sucide Case: रियाची मॅनेजर श्रृती मोदीची ED कडून ८ तास चौकशी