घरताज्या घडामोडीSushant Singh Rajput: सुशांतचं आलिशान घर भाड्याने मिळतयं, किती पैसे मोजायचे माहितेयं?

Sushant Singh Rajput: सुशांतचं आलिशान घर भाड्याने मिळतयं, किती पैसे मोजायचे माहितेयं?

Subscribe

सुशांतचा हा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर असून फ्लॅटला सुंदर सी व्ह्यू आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मृत्यू होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही त्याच्या आठवणींमधून लोक बाहेर आलेले नाहीत. आजही अनेक जण सुशांतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सुशांत केवळ उत्तम अभिनेताच नव्हता तर त्याला अनेक गोष्टींचे ज्ञान होते. रंग संगतीत सुशांतला विशेष आवड होती. त्याच्या सर्व आवडी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पहायला मिळतात. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट त्याने विचार करुन तयार केली होती. त्यामुळे त्याचे घर सर्वासाठी विशेष होते. मृत्यूपूर्वी सुशांतने एका कंपनीसाठी केलेल्या अँड फिल्ममध्ये सुशांतच्या संपूर्ण घराची सफर दिली होती. सुशांतच्या प्रत्येक फॅन,नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी त्याचे घर नेहमीच खास होते. मात्र आता सुशांतच्या मृत्यूनंतर वांद्रे येथील मॉन्ट ब्लँक आपार्टमेंटमधील सुशांतचा फ्लॅट तपासासाठी ताब्यात घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा अपार्टमेंट फ्लॅट भाड्याने देण्यासाठी तयार आहे. (Sushant  Singh Rajput’s bandra luxurious Flat Available on rent)

 

- Advertisement -

सुशांतचा हा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर असून फ्लॅटला सुंदर सी व्ह्यू आहे. सेलिब्रेटी ब्रोकरने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. ते नव्या भाडेकरुची वाट पाहत आहेत. कोरोनाच्या काळात अनेक जण हा फ्लॅट पाहण्यासाठी येऊ शकले नाहीत. सुशांतचा हा फ्लॅट केवळ भाड्याने घ्यायचा असल्यास त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागणार आहे. सुशांतने डिसेंबर २०१९मध्ये हा फ्लॅट महिना ४ लाख ५१ हजार रुपये भाड्याने विकत घेतला होता. (Sushant’s bandra luxurious Flat in rent Available on 4 lakh 51 hundred rupees )हाच फ्लॅट आता भाड्याने विकत घेण्यासाठी महिना ४ लाख ७४ हजार रुपये  मोजावे लागणार आहेत. कोरोना महामारीमुळे घरभाडे करुन आता हा फ्लॅट ४ लाख रुपयांनी देण्यात येणार आहे.

- Advertisement -

सुशांतने २०१९ मध्ये हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. सुशांत २०२२पर्यंत सुशांत या फ्लॅटमध्ये राहणार होता. सुशांत सिंह राजपूतसोबत त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी आणि सुशांतच्या घरातील नोकर नीरज आणि केशव या फ्लॅटमध्ये राहत होते. सुशांतच्या इतक्या आलीशान सुंदर घरातच सुशांतच्या बेडरुममध्ये सुशांतचा पंख्याला लटकलेला मृतदेह समोर आला.


हेही वाचा – कंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? देशद्रोहाच्या आरोपामुळे प्राधिकरणाचा पासपोर्ट नुतणीकरणास नकार

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -