घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी CBIशी बोलला खोटं!

Sushant Suicide Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी CBIशी बोलला खोटं!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत. सध्या सीबीआय सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत असून यादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. दरम्यान सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने सीबीआयच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला (Special Investigation Team – SIT) सांगितले की, ‘सुशांतच्या घरातील सदस्यांनी त्याला सुशांतचा लटकलेला मृतदेह खाली उतरवण्याची विनंती केली होती.’ यानंतर सुशांतच्या कुटुंबाने त्याच्यावर खोटं बोलण्याचा आरोप केला आहे.

याबाबत आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सुशांतच्या कुटुंबातील सदस्य म्हणाला की, ‘सुशांतचा मृतदेह कुटुंबातील सदस्यांच्या विनंतीवरून खाली काढण्यात आल्याची बातमी माध्यमांमध्ये दाखवली जात आहे. तसेच याबाबतचे पिठानी याचं विधान खोटं आहे.’

- Advertisement -

‘प्रत्यक्षात कोरोना काळ असल्यामुळे कुटुंबातील सदस्य १४ जून रोजी संध्याकाळी दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आणि त्यावेळी सुशांतच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला’, असे सुशांतच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले.

आत्महत्येच्या दिवशी मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृतदेह वांद्र फ्लॅटमधून कूपर रुग्णालयात नेला होता. पण त्या रात्री ११ वाजता शवविच्छेदन करण्यात सुरुवात झाली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे शवविच्छेदनाच्या विलंबामुळेही काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. तसेच सुशांतच्या खोलीची चावी फ्लॅटमधून कशी गायब झाली? याबद्दल कुटुंबातील सदस्याला आश्चर्य वाटले. याबाबत कुटुंबातील सदस्याने सांगितले की, ‘प्रत्येकजण घरी असतानाही फ्लॅटमधून चावी गायब झाली, हे लक्षात येताच आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. त्यानंतर चावी तयार करणाऱ्या व्यक्तीला बोलावलं गेलं आणि त्याला खोलीत जाण्याची परवानगी दिली नव्हती, हे देखील आमच्यासाठी आश्चर्यकारक होते.’ त्यामुळे सध्या सुशांतच्या कुटुंबियातील सदस्य अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Sushant Singh Rajput : ‘सुशांतची ऑटोप्सी जाणून बुजून उशिरा केली!’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -