Sushant Sucide case: सुशांतच्या जीवाला धोका असल्याचं मुंबई पोलिसांना २५ फेब्रुवारीला कळवलं होतं!

सुशांत सिंह साजपुतचे वडिल

अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणात सतत नवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतचे वडिल के.के सिंह यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. पटना पोलिसांची या प्रकरणात का मदत घ्यावी लागली याविषयी खुलासा त्यांनी या व्हिडिओतून केला आहे.

काय आहे व्हिडिओत

सुशांतचे वडिल या व्हिडिओत म्हणतात, २५ फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना सांगितलं होती की माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. त्यावेळी आम्ही काही नामांकित लोकांविरोधात कारवाईची मागणी केली होती. पण ४० दिवसानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. १४ जूनला माझ्या मुलाचा मृत्यू झाला.

यानंतर मी पाटण्याला गेलो आणि पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पाटणा पोलीसांनी  त्वरीत कारवाईला सुरूवात केली. परंतु गुन्हेगार आता पळून जात आहेत, आम्हाला सर्वांना असं वाटतं की पाटणा पोलिसांना सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी नेते नितीश कुमार यांचे आभरही मानले.

तक्रारीबद्दल माहिती नाही

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मात्र सुशांतच्या वडिलांनी २५ फेब्रुवारीला केलेल्या तक्रारीबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. यात रियाने पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी राजकारण तापले असून बिहार पोलिसांनी आक्रमक तपास सुरू केला असताना हा तपास सीबीआयकडे देण्यावरून राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे.