अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येला आता १ महिना उलटून गेला असला तरी दररोज नवीन काहीतरी गोष्ट समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. त्यात सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यातच आता सुशांत राजपुतचा फॉरेन्सिक टेस्ट व्हिडिओ लीक झाल्याचं समोर आलं आहे.
या लीक झालेल्या व्हिडिओमध्ये तपास करणाऱ्या एका ऑफिसर असं म्हणतो आहे की, हा व्हिडिओ लीक होता कामा नये नाहीतर आपला तपास वाया जाईल. आता या व्हिडिओत असणारा आवाज नेमका कोणाचा आहे? तो खरा आहे का की डब केलेला आहे? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
या आधी सोशल मीडियावर सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना दिलेली तक्रारीची प्रत देखील व्हायरल झाली होती. ७ पानी ही तक्रार प्रत होती. ज्यामध्ये त्यांनी रिया चक्रवर्तीवर खूप गंभीर आरोप लावले होते.
या फिर्यादीमध्ये रियाने आर्थिक फसवणुकीचा आरोप केला असल्यामुळे ईडी त्याबाजूने तपास करणार आहेत. के.के. सिंह यांनी रियानं सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा ईडी आता या अंगाने तपास करणार आहेत. ईडीनं सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीची माहिती आणि सर्व बँक खात्यांची माहिती मागवली आहे. या माहितीची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे