घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: 'रियाच्या मागे लपले आहेत खरे गुन्हेगार'

Sushant Suicide Case: ‘रियाच्या मागे लपले आहेत खरे गुन्हेगार’

Subscribe

एका मुलाखतीत सुशांतचा मैत्रिणीने हा दावा केला.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला जवळपास २ महिने झाले आहेत. यादरम्यान याप्रकरणातील अनेक खुलासे झाले आहेत. आता सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री वैशाली टक्कर समोर आली असून तिने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे. तसेच याप्रकरणातील खरे गुन्हेगार रिया चक्रवर्तीच्या मागे लपले आहेत’, असा दावा वैशालीने केला आहे.

‘स्पॉटबॉय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना वैशाली टक्कर म्हणाली की, ‘सुशांत हा असा व्यक्ती होतो दुसऱ्यांचे जीवन वाचवू इच्छित होता. याचाच अर्थ असा की, तो जीवनाला खूप महत्त्व देत होता. एक व्यक्ती जो जीवनाला इतके महत्त्व देत होता, तो आत्महत्या कशी करेल आणि आपले जीवन कसे संपवून घेईल? ही मला एक हत्या वाटत आहे. सुशांतने खूप चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी सहज सुटू शकणार नाहीत. हेच कारण असल्यामुळे अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि संपूर्ण जग त्याच्यासाठी लढत आहे.’

- Advertisement -

जेव्हा यावेळेस वैशालीला विचारले गेले की, तुला ही हत्या का वाटते? तेव्हा ती म्हणाली की, ‘सुशांतच्या निधनानंतर काही मिनिटांत त्याच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले होते. माझ्या जवळही ते फोटो आहेत. पण ते पाहण्याची माझ्यात हिम्मत नाही आहे. सुशांतच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. दोन ते तीन दिवस मी रडत होते आणि मी त्याचा मृत्यू स्वीकारू शकत नव्हते. पण जेव्हा लोक सुशांतची हत्या असल्याचे चर्चा करू लागले आणि त्याच्या बॉडी आणि मानेवर खूणा दिसल्या. त्यानंतर मला काहीतरी गडबड असल्याचे समजले. सुरुवातील या सर्व प्रकरणात मुव्ही माफियांना दोष देण्यात आले होते, परंतु आता रियाचे सत्य समोर येत आहे.’

- Advertisement -

यानंतर वैशाली जेव्हा असा प्रश्न विचारला की, सुशांतच्या मृत्युला रिया जबाबदार आहे? तेव्हा वैशाली म्हणाली की, ‘मला वाटते हे एक प्रकारे टीम वर्क आहे. हे फक्त एका व्यक्तीचे काम नाही. मला हे प्रकरण किती खोल आहे हे माहित आहे. परंतु यामध्ये अनेक लोक सामील आहेत. याप्रकरणातील खरा गुन्हेगार रिया चक्रवर्ती मागे लपला आहे असे मला वाटते.’


हेही वाचा – सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -