घरताज्या घडामोडीSushant Suicide case: NCB ने केली ड्रग्ज डिलरला अटक,बॉलिवूड,राजकारणातील अनेक नावं समोर!

Sushant Suicide case: NCB ने केली ड्रग्ज डिलरला अटक,बॉलिवूड,राजकारणातील अनेक नावं समोर!

Subscribe

सुशांत सिंग राजपुत प्रकरणाचा तपास आता ड्रग्ज अँगलने केला जात आहे. NCB ची टीम या तपासात सक्रीय झाली आहे. आत्तापर्यंतच्या तपासात नारकोटिक्सला मोठं यश मिळालं आहे. एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज सप्लाअर राहिल राफत याला अटक केली आहे. राहिलची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. राहिलने अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. बॉलिवूडमध्ये राहिलला ‘सॅम ड्रग अंकल’ म्हणून ओळखलं जातं.

एनसीबीचा बॉलिवूडकरांभोवतीचा फास आवळत चालला आहे. रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांच्या अटकेनंतर आता करण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमली पदार्थांचा वापर करण्यात आला होता की नाही याची चौकशीही करण्यात येणार आहे. त्यामुळेच राहिल ऱफतची अटक एनसीबीसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी अटक ठरली आहे.

- Advertisement -

राहिलचा ‘बॉस’ बॉलिवूडशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा बॉस अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता यांपैकी कोणीही असू शकतो. राहिलच्या माध्यमातून तपास यंत्रणा बॉलिवूडमधील मोठ्या नावांपर्यंत पोहचू शकतात असा एनसीबीचा विश्वास आहे. वृत्तानुसार, राहिलने एनसीबीच्या चौकशीत ज्या व्यक्तीसाठी राहिल काम करतो त्याला ‘बॉस’ या नावाने ओळखतो. ही व्यक्ती एक मोठा ड्रग्ज पेडलर असून स्वतः फिल्म इण्डस्ट्रीशी निगडीत आहे. राहिल आपल्या ‘बॉस’च्या सांगण्यावरून सेलिब्रिटींना मलाना क्रीम पुरवायचा.


हे ही वाचा – ‘जोकर २’ येतोय, पण चर्चा रंगलीये खलनायकाच्या ३६७ कोटी रूपये मानधनाची!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -